नवी दिल्ली।अमेरिकेमध्ये निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत.त्याच पार्श्वभूमीवर आता फेसबुकने सावध पावले टाकायला सुरुवात केली आहे.फेसबुकने आज (मंगळवार) फेसबुकवरील ३० आणि इन्स्टाग्रामवरील ८५ खाती ब्लॉक केली आहेत. ही खाती परदेशातील काहीं जणांशी संबंधीत असल्याची माहिती मिळत आहे. फेसबुकने आक्षेपार्ह वाटणारी तब्बल ११५ खाती निवडणुकीपूर्वीच ब्लॉक केली आहेत. कारण दोन वर्षांपूर्वी निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप फेसबुकवर करण्यात आला होता.
Facebook blocks some 30 accounts and 85 accounts on Instagram over concerns they may be linked to foreign entities aimed at interfering in US midterm elections: AFP news agency pic.twitter.com/IR25roYXk4
— ANI (@ANI) November 6, 2018
भारतात सुद्धा येत्या काळात निवडणुका आहेत. यामुळे अमेरिकेसह भारतातील सरकारांना आश्वस्त करण्यासाठी फेसबुकने पहिले पाऊल उचलले आहे.अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीमध्ये सोशल प्रचारावेळी गैरवापर झाल्याचा आरोप फेसबुकवर करण्यात आला होता. यावर सुनावणीही सुरु आहे. त्यातच नुकतेच ९ लाखांवर खाती हॅक झाली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.