HW News Marathi
देश / विदेश

फेसबुकची अमेझॉनशी थेट स्पर्धा

मुंबई : ई कॉमर्समध्ये आपला व्यवसाय वाढविण्यासाठी फेसबुकने आता ई-कॉमर्स मार्केटमध्येही एन्ट्री करण्याचे ठरवले आहे. यामध्ये फेसबुकची थेट वॉलमार्ट आणि अमेझॉनशी स्पर्धा असेल. यासंदर्भात फेसबुकने काही प्रसिद्ध ब्रॅंडसोबत चर्चा करायलाही सुरुवात केली आहे. जून महिन्यात फेसबुक ई कॉमर्स वेबसाईट लॉंच करणार आहे. सध्या वेबसाईटचे टेस्टिंग सुरु असल्याची माहिती सध्या समोर आली आहे.

नोव्हेंबर महिन्यात गतवर्षी पहिल्यांदा फेसबुकने मार्केटप्लेस भारतात लॉंच केले. त्यानंतर फेसबुक सातत्याने मार्केटप्लेसला विकसित केले जात आहे. आता याच माध्यमातून ग्राहकांना ई-कॉमर्सला जोडण्याचा प्रयत्न फेसबुकने सुरु केला आहे. फेसबुक आपल्या ई-कॉमर्स वेबसाईट नवीन टूल्स विकसित करणार असून, कुठल्याही कंपनीला प्रॉडक्ट्स अपलोड करणे आणि स्टॉक मॅनेज करणे शक्य होईल, अशा पद्धतीचे वेबसाईटचे स्वरुप असेल. तसेच, वर्षअखेरपर्यंत फेसबुक पेमेंट सिस्टमसुद्धा सुरु करणार असल्याची माहीती समोर आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानचे एफ-१६ लढाऊ विमान भारतानेच पाडल्याचे वायुसेनेकडून पुरावे

News Desk

जाणून घ्या… वांद्रेतील घटनेवर राज्यातील नेते मंडळींच्या ‘या’ प्रतिक्रिया

News Desk

राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकशाहीला धक्का देणारा! – अजित पवार

Aprna