नवी दिल्ली | बंगाल उपसागरात उसळलेले ‘फनी’ चक्रीवादळ शुक्रवार (३ मे) काहीच वेळात ओडिसा किनारपट्टीला धडकणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सकाळी १० ते दुपारी १२ च्या सुमारास हे फनी चक्रीवादळ १७० ते २०० किलोमीटर प्रतितास इतक्या प्रचंड वेगाने ओडिसा किनारपट्टीला धडकणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. या पार्श्वभूमीवर ओडिसामध्ये अति दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. जेडब्ल्यूटीसीनुसार, ‘फनी’ हे गेल्या २० वर्षांतील आतापर्यंतचे सर्वात भयंकर चक्रीवादळ ठरू शकते. फनी वादळासंदर्भात पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून याबबतची माहिती देण्यात आली आहे.
#WATCH Visuals from coastal town of Digha in West Bengal as #CycloneFani is expected to make landfall in Odisha's Puri district by 11 am. According to the Met Dept, the impact of landfall process has begun. pic.twitter.com/R5iJY4vjGD
— ANI (@ANI) May 3, 2019
HR Biswas, Director, Met Dept, Bhubaneswar: Extremely severe cyclone Fani landfall started at 8 AM. Some of the portion of the eye has already entered land area. It'll take 2 more hrs to complete landfall process. Landfall position is close to Puri. It'll continue upto 10.30 AM. pic.twitter.com/QaG2CGgmYg
— ANI (@ANI) May 3, 2019
समुद्र किनाऱ्याजवळ वस्तीस असणाऱ्या ११ लाख लोकांचे स्थलांतर
फनी चक्रीवादळामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाकडून चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. यासाठी प्रथम समुद्र किनाऱ्याजवळ वस्तीस असणाऱ्या ११ लाख लोकांचे स्थलांतर करण्यात आले असून ओडिशा सरकारकडून शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे भुवनेश्वर आणि कोलकाता विमानतळावरची हवाई वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. कोलकाता विमानतळ हे शनिवारी संध्यकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या फनी चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी एनडीआरएफची तब्बल ८१ पथके सज्ज आहेत. या पथकांमध्ये ४ हजारांपेक्षा अधिक विशेष कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
निवडणूक आयोगाने हटविली आचारसंहिता
देशात सध्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता सुरु आहे. मात्र, फनी चक्रीवादळाचे हे मोठे संकट लक्षात घेता मदत आणि बवाचकार्यात कोणत्याही प्रकारची समस्या किंवा अडथळा येऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने ११ जिल्ह्यातील आचरसंहिता हटविली आहे. १९९९ साली ओडिसामध्ये आलेल्या सुपर सायक्लॉनमध्ये जवळपास १० हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार गेल्या ४३ वर्षांमध्ये एप्रिल महिन्यात भारताच्या जवळपासच्या समुद्री पट्ट्यात असे चक्रीवादळ येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.