HW News Marathi
देश / विदेश

87 वर्षाचा पोस्टमन निघाला 1300 बालकांचा बाप

वृत्तसंस्था- जुन्या काळात एखाद्या कुटुंबात दहा बारा मुले जन्माला येत असत. काही कुटुंबात तर साठ ते सत्तर मुले असल्याचा बातम्या आपण वृत्तपत्रात वाचलेल्या असतील परंतु एका व्यक्तीने तब्बल तेराशे मुलांना जन्म दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही बाब काल्पनिक नसून एक संस्थेने गुप्त संशोधन करून ही माहिती उजेडात आणली आहे. जॉनी कॅश असे या महापित्याचे नाव आहे. त्याचे सध्या वय 87 वर्षे आहे. तो पोस्टमन असताना दररोज महिलांशी संबंध ठेवत होता. सेवानिवृत्त होईपर्यंत त्याने तब्बल तेराशे मुलांचा बाप होण्याचा मान मिळवला.

या संदर्भात एका गुप्तहेर संस्थेने संशोधन करून ही माहिती उजेडात आणली आहे. वल्ड न्यूज रिपोर्टनूसार टेनिस या व्यक्तीने 2001 साली एका गुप्तहेराला या विषयी संशोधन करण्याचे काम दिले होते. 15 वर्षे त्या व्यक्तीच्या हालचालीवर गुप्तरित्या नजर ठेवण्यात आली. तपास करताना गुप्तहेरांना एका प्रांतातील शेकडो डीएन सॅम्पलची तपासणी केली. त्यात एकच व्यक्ती तेराशे मुलांचा बाप असल्याचा धक्कादायक निष्कर्ष हाती आला. विशेष म्हणजे संशोधनातील निष्कर्ष त्या व्यक्तिला दाखवण्यात आल्यानंतर त्यालाही धक्का बसला. परंतु त्याने हसत हसत आपल्या कतृत्वावर अभिमान व्यक्त केला. तारुण्यात आकर्षक व्यक्तीमत्व असल्याने तसेच दररोज नवनव्या घरी जाण्याची संधी मिळत असल्याने महिला आपल्याकडे आकर्षित होत. त्यातून संबंध आले. त्याकाळी कंडोम किंवा गर्भपात करण्याची साधने नव्हती. त्यामुळे मुले जन्माला आली, असे त्याने नम्रपणे सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोरक्षकांच्या हिंसेवरून संसदेत गदारोळ

News Desk

वाराणसीतील मॉलमध्ये गोळीबार

Gauri Tilekar

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वविजेत्या महिला क्रिकेटपटूंचे अभिनंदन

Aprna