HW Marathi
देश / विदेश राजकारण

#FightCorona | देशातील ऑटोमोबाइल कंपन्यांना व्हेंटीलेटर्स बनविण्याचे केंद्राचे आदेश

नवी मुंबई | संपूर्ण जग सध्या ‘कोरोना’विरुद्धचा लढा लढत आहे. केंद्र आणि राज्य सरकार सध्या या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता केंद्राने मोठा निर्णय घेतला आहे. आता देशातील ऑटोमोबाइल कंपन्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्हेंटिलेटर्स तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यादृष्टीने आता या सर्व ऑटोमोबाइल कंपन्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या आपल्याला वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित अनेक वस्तू, साधन-सामग्रीची मुबलक उपलब्धता असणे अत्यंत आवश्यक आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून या व्हेन्टिलेटर्सच्या उत्पदनाला सुरुवात होईल.

भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड पुढील २ महिन्यांत स्थानिक उत्पादकांसह ३० हजार व्हेंटीलेटर्स, नोएडाच्या Agva Healthcareलाही १ महिन्यात १० हजार व्हेंटिलेटर्सचे उत्पादनही करणार आहे. व्हेंटिलेटर बनविण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान, आणि उत्पादन, विक्रीची जबाबदारी AgVa Healthcareची असणार आहे. तर ‘मारुती-सुझुकी’ कंपनी व्हेंटिलेटर्सच्या उत्पादनासाठी लागणारी आर्थिक मदत, अन्य परवानग्या तसेच व्हेंटिलेटर्सचे उत्पादन करण्यासाठी लागणारे सुटे भाग मिळवण्यासाठी आपल्या सप्लायर्सचा वापर करणार आहे. तसेच ‘मारुती सुझुकी’ने व्हेंटिलेटर, मास्क आणि इतर संरक्षक उपकरणे तयार करण्यासाठी अन्य उत्पादकांशी करार देखील केला आहे.

पुढील आठवड्यापर्यंत दरदिवशी १ लाख मास्कचे तयार करण्याचे लक्ष्य आहे. त्यादृष्टीने विविध कंपन्यांना, उद्योगांना हे मास्क तयार करण्याचेही काम देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे रेडक्रॉसने आज १०,००० पीपीई म्हणजेच डॉक्टरांसाठीची वैयक्तिक संरक्षक उपकरणे दान केली आहेत. तर भारताकडून दक्षिण कोरियालाही २० लाख पीपीई बनविण्याची ऑर्डर देण्यात आली आहे.

Related posts

मेहुल चोक्सी केवळ तब्येतीची कारणे देत कारवाईस विलंब करत आहे !

News Desk

INX Media Case : मोदी सरकार पी. चिदंबरम यांची बदमानी करत आहे !

News Desk

राष्ट्रवादीने अहमदनगरच्या १८ नगरसेवकांना केले बडतर्फ

News Desk