नवी दिल्ली | बंगळूरु येथे आज (१ फेब्रुवारी) मिराज 2000 हे लढाऊ विमान कोसळून झालेल्या अपघातात दोन वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नेगी आणि अबरोल अशी या दोन वैमानिकांची नावे आहेत. खरंतर या दोन्ही वैमानिकांनी विमानाला आग लागल्यानंतर पॅरॅशूटचा वापर करत उडी मारली होती. मात्र दुर्दैवाने त्यातील एक पायलट आग लागलेल्या विमानाच्या अवशेषांवर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असून दुसऱ्या वैमानिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, हे विमान एचएएलद्वारे अद्ययावत करण्यात आले असतानाही या विमानाचा अपघात झाल्याने हवाई दलाकडून या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
#Visuals: Mirage 2000 trainer fighter aircraft of HAL crashes at HAL Airport in Bengaluru, one pilot dead. #Karnataka pic.twitter.com/oM4CUEPu97
— ANI (@ANI) February 1, 2019
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.