नवी दिल्ली | पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याला अखेर आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे. अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात यावे यासाठी गेले अनेक दिवस भारत प्रयत्नशील होता. त्यामुळे भारतासाठी हे अत्यंत मोठे यश मानले जात आहे. या प्रकरणी कायमच आडमुठी भूमिका घेणाऱ्या चीनने अखेर संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंध समितीच्या बैठकीत मसूद अजहरला आंतराराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.
Big,small, all join together.
Masood Azhar designated as a terrorist in @UN Sanctions list
Grateful to all for their support. 🙏🏽#Zerotolerance4Terrorism
— Syed Akbaruddin (@AkbaruddinIndia) May 1, 2019
Syed Akbaruddin, India's Ambassador to the UN: Big, small, all join together. Masood Azhar designated as a terrorist in UN Sanctions list. pic.twitter.com/lVjgPQ9det
— ANI (@ANI) May 1, 2019
पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड जैश-ए- मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठीचा प्रस्ताव १३ मार्च रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने फेटाळला होता. अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघाकडे अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्स या तिन्ही देशांनी मांडला होता. परंतु या प्रस्तावाविरोधात चीनने नकाराधिकाराचा (व्हेटो) वापर केल्याने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीने हा प्रस्ताव फेटाळाला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.