नवी दिल्ली। देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) मधील भागीदारी सरकार विकणार आहे. तसेच एलआयसीपाठोपाठ आयडीबीआय बँकेची भागीदारी देखील सरकार विकणार आहे. एलआयसी आणि आयडीबीआयची भागीदारी विकण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण काल (१ फेब्रुवारी) संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात केली.
Finance Minister Nirmala Sitharaman: Government proposes to sell a part of its holding in LIC by initial public offer. #BudgetSession2020 pic.twitter.com/j8gAKPXNJ8
— ANI (@ANI) February 1, 2020
दरम्यान, विमा क्षेत्रातील भागीदारी विकणारी एलआयसी ही पहिलीच कंपनी नाही. तर तीन वर्षांपूर्वी दोन सरकारी कंपन्या भागीदारी सरकारने विकली होती. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन आणि न्यू इंडिया अशुरन्सचे आयपीओ शेअर बाजारात नोंद करण्यात आले आहेत. एलआयसी विमा कंपनी विकण्याचा फायदा सरकारला होणार असला तरीही सरकारला कायद्यात बदल करावे लागणार आहेत.
आय.डी.बी.आय आणि एलआयसीमधील शेअर्स विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकार एलआयसीचे आयपीओ आणणार असून अंतर्गत एलआयसीमधील मोठा समभाग विकणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे. या अर्थसंकल्पात बऱ्याच मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. एलआयसीची भागीदारी विकणे हे सरकारचा महसूल वाढविण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल असेल्याचे बोलले जाते. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीचा अधिशेष २०१८-१९ मध्ये ९.९ टक्क्यांनी वाढून २ ५३.१४ अब्ज रुपये झाला आहे. ही पहिलीच वेळ होती जेव्हा एलआयसीच्या अधिशेषने ५०० अब्ज रुपयांची पातळी ओलांडली.
सरकार आयडीबीआय बँकेची भागीदारीही खासगी कंपन्यांना विकणार आहे. पण याचे सर्व नियंत्रण सरकारकडे असणार आहे. सरकारकडे याची एकूण किती भागीदारी असणार याबाबत सरकारने अद्याप खुलासा केलेला नाही. आर्थिक वर्ष म्हणजेच २०१९-२० च्या सुरुवातीच्या सहा महिन्यात (एप्रिल ते सप्टेंबर) एलआयसीच्या गैर निष्पादित संपत्ती म्हणजे एनपीएमध्ये ६.१० टक्के वाढ झाली आहे. हा एनपीए खासगी क्षेत्रातील एस बँक, आयसीआयसीआय, एक्सिस बँकेंच्या एनपीए जवळ आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.