मुंबई | पीएम केअर्स फंडविरोधात दिशाभूल केल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटकच्या शिवमोग्गामध्ये जिल्ह्यात एका वकिलाने पीएम केअर्स फंडविरोधात संभ्रम पसरवल्याप्रकरणी सोनिया गांधीविरधात पोलिसांत तक्रार केली आहे. सोनिया गांधींविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. सोशल मीडियावर काँग्रेस पक्षाकडून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.
They called PMCARES fund a fraud. They said on their twitter that it is not being used for public & that PM is going on foreign trips using this fund. These are rumours against govt in #COVID19 situation, so I filed a complaint (against Sonia Gandhi): KV Praveen Kumar, Advocate https://t.co/ZmmYpRsENI pic.twitter.com/bzo2WkvuYx
— ANI (@ANI) May 21, 2020
पीएम केअर्स फंडासंदर्भात काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरुन दिशाभूल करणारे ट्वीट केल्याचा आरोप वकील के व्ही प्रवीण यांनी केला असून, ११ मे रोजी कर्नाटकच्या शिवमोग्गामध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र, कोणत्या ट्विटविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पंतप्रधान केअर्स फंडाची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणीही सतत काँग्रेस पक्षाकडून केली जात आहे. सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या मुद्द्यावर सतत सरकारवर टीका केली जात आहे. त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही काँग्रेसच्या वतीने पत्रही लिहिले गेले आहे.
सोनिया गांधींविरधाय ‘या’ कलमा अंतर्गत गुन्हा दाखल
सोनिया गांधी यांच्याविरोधात आयपीसीच्या कलम १५३, ५०५ अंतर्गत हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सोनिया गांधींवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी एफआयआरमध्ये करण्यात आली आहे. प्रवीण नावाच्या स्थानिक वकिलाने हा एफआयआर दाखल केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.