लखनऊ | उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये गुंडांनी पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार केला, त्यात डीएसपी देवेंद्र मिश्रा आणि स्टेशन प्रभारी यांच्यासह ८ पोलीस शहीद झाले आहेत. विकास दुबेविरोधात कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला असून, हे पोलीस पथक त्याला पकडण्यासाठी गेले असता त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात डीएसपीसह ८ पोलीस शहीद झाले.
या अंदाधुंद गोळीबारात पोलीस पथकातील एक सीओ, एक एसओ, २ एसआय आणि ४ जवान शहीद झाले असल्याची माहिती परिसरातील डीएम यांनी दिली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तसेच, दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी डीजीपी एचसी अवस्थी यांना दिले असून, त्यांनी घटनेचा अहवालही मागवण्यात आला आहे.
Around 7 of our men were injured. Operation still underway as criminals managed to escape, taking advantage of the dark. IG, ADG, ADG (Law & Order) have been sent there to supervise operation. Forensic team from Kanpur was at spot, an expert team from Lucknow also being sent: DGP https://t.co/WdqVMbKgXk
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) July 3, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.