नवी दिल्ली | कोरोना पसरण्याचा वेग कमी होत असतानाच ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या कोरोनानं डोकेदुखी आणि चिंता वाढवली आहे. वेगानं पसरणाऱ्या कोरोनाच्या या नवीन प्रकारानेही जगभरात हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत १६ देशात पोहोचलेल्या करोनाच्या नव्या प्रकाराने आता भारतातही शिरकाव केला आहे. देशात करोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झालेले सहा रुग्ण आढळून आले आहेत. आणि त्यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. एकीकडे कोरोना रुग्ण संख्या संपूर्ण देशभरातील आटोक्यात येत असताना नव्या प्रजातीच्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे.
Samples of 3 UK returnees have been tested & found positive for new UK strain in NIMHANS, Bengaluru, two in Centre for Cellular and Molecular Biology, Hyderabad & one in National Institute of Virology, Pune. All 6 people have been kept in single room isolation: Health Ministry https://t.co/tgrWYLKh2G
— ANI (@ANI) December 29, 2020
ब्रिटनमध्ये करोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे. आहे. मात्र, तरीही नव्या कोरोनानं भारतात पाऊल ठेवलं आहे. २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान ब्रिटनमधून ३३ हजार नागरिक भारतात परतले आहेत. या सर्व प्रवाशांचा शोध घेण्यात आला आणि चाचण्या करण्यात आल्या आहेत. यात ११४ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचे नमुने देशातील १० प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले होते. यात कोलकाता, भुवनेश्वर, एनआयव्ही पुणे, सीसीएस पुणे, सीसीएमबी हैदराबाद, सीसीएफडी हैदराबाद, इन्स्टेम बंगळुरू, एनआयएमएचएएनएस बंगळुरू, आयजीआयबी दिल्ली आणि एनसीडीसी दिल्ली या प्रयोगशाळांमध्ये हे नमुने पाठवण्यात आले होते.
COVID-19: Six UK returnees found positive for new UK variant genome pic.twitter.com/yB79DCZpgf
— ANI (@ANI) December 29, 2020
यात बंगळुरू येथील प्रयोगशाळेत पाठवलेल्या नमुन्यापैकी तीन रुग्णांमध्ये नवीन स्ट्रेन (नवीन प्रकार) आढळून आला आहे. तर हैदराबाद प्रयोगशाळेतील दोघांच्या शरीरात आणि पुण्यातील प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आलेल्या नमुन्यांपैकी एका नमुन्यात हा स्ट्रेन आढळला आहे. एकूण सहा रुग्णांच्या शरीरात करोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे. या सर्व रुग्णांना संबंधित राज्यांनी स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवलं आहे. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर अन्य प्रवाशांची माहिती घेण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.