मुंबई | देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनदरम्यान देशातील विविध राज्यात अडकलेल्या परराज्यातील मजूर, विद्यार्थी आणि यात्रेकरूंना त्यांच्या घरी पोहोचविण्यााठी ट्रेन सोडण्याची विनंती तेलंगाणा राज्याने केली होती. तेलंगणच्या लिंगमपल्ली येथून झारखंड राज्यातील हटियासाठी १२०० जणांना नेण्यासाठी पहिली ट्रेन रवाना झाली. ही ट्रेन आज पहाटे वाजून ५० मिनिटांनी सुटली. २४ डबे असलेली ही ट्रेन आज (१ मे) रात्री ११ वाजता झारखंडच्या हटिया येथे पोहोचेली.
First train carrying 1200 migrants from Lingampally in Telangana to Hatia in Jharkhand started at 4:50 am today: RPF DG
— Press Trust of India (@PTI_News) May 1, 2020
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, तेलंगणहून झारखंडला रवाना झालेली ही ट्रेन नॉनस्टॉप ट्रेन असणार आहे, असे आरपीएफचे महासंचालक अरुण कुमार म्हणाले. या ट्रेनमध्ये एकूण १२०० प्रवासी असून ती रात्री १२ वाजता हटिया येथे पोहोचेल, अशी माहिती त्यांनी दिली. देशात कोरोनाचा संसर्ग पाहाता रेल्वे प्रशासनान मालगाडी वगळता सर्व सेवा बंद केल्या आहेत. या ट्रेनमध्ये स्थलांतरित मंजुरांच्या चाचण्याची तयारी झारखंड सरकारने केली असून त्याप्रमाणे ट्रेनमधून प्रवास केलेल्या मंजुरांना क्वारंटीन ठेवण्यासाठीची तयारी करण्यात आल्याचे झारखंडमधील संबंधित शासकीय अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले.
Special train was run today from Lingampalli(Hyderabad) to Hatia(Jharkhand)on request of Telangana Govt&as per directions of Railway Ministry. Any other train to be planned as per directions of Ministry of Railways&on request from originating&destination states: Railway official pic.twitter.com/JiGias3BaG
— ANI (@ANI) May 1, 2020
देशातील इतर राज्यात अडकलेल्या मंजुरांना त्यांच्या राज्यात पाठविताना केंद्र सरकारने काही सूचना दिल्या आहेत. यात राज्यात अडकलेल्या लोकांची नोंदणी, वाहनांची व्यवस्था अशा बऱ्याच बाबींचा समावेश आहे. या सगळ्या व्यवस्था करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत या सगळ्यांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्याची व्यवस्था करणे ही बाब सगळ्या राज्य सरकारांसाठी मोठे आव्हान झाली आहे.
तेलंगणामधुन मजुरांसाठी विशेष ट्रेन रवाना,महाराष्ट्रातून कधी ?
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.