HW News Marathi
देश / विदेश

भारतात ‘मोमो चॅलेंज’चा पहिला बळी

जयपूर | ‘ब्लू व्हेल’ या गेमने जगभरात अनेक बळी घेतले. त्या पाठोपाठ आता ‘मोमो चॅलेंज’ हा नवीन गेम समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या गेममुळे अर्जेंटिनामध्ये एका १२ वर्षाच्या मुलीने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. त्यानतंर आता ‘मोमो चॅलेंज’ने भारतातही पहिला बळी घेतला आहे. राजस्थानातमधील १० वी शिकणाऱ्या विद्यार्थीनीने ‘मोमो’ गेमच्या नादी लागून ३१ जुलैला आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

राजस्थानातल्या ब्यावर इथल्या १० वीतल्या विद्यार्थीनीने ३१ जुलैला आत्महत्या केली. या मुलीने सर्व कुटूंबियांसोबत तीन दिवसांपूर्वीच वाढदिवस साजरा केला होता. कुणाला कल्पानाही आली नाही की तीन दिवसांनंतर ही मुलगी अशी काही करेल. तीने घरात कुणी नसताना खोलीतल्या पंख्याला दोरी बांधून आत्महत्या केली. तीच्या शरीरावरच्या जखमा या मोमोच्या असल्याचे समोर आले आहे. या जीवघेण्या गेमचा हा भारतातला पहिला बळी असल्याचे बोलले जात आहे.

मोमो चॅलेंज गेम म्हणजे नेमके काय

हा ब्ल्यू व्हेल चॅलेंजप्रमाणे एक ऑनलाईन गेम आहे. यात व्हाटसअ‍ॅप अकाऊंटच्या माध्यमातून विशिष्ट युजर्सकडून आलेले विविध चॅलेंजेस स्वीकारायचे असतात. काही ठिकाणी फेसबुक ग्रुप्समधून याचा प्रचार झाल्याचे निदर्शनास आले आहे. यातील बहुतेक चॅलेंजेस हे स्वपीडेला प्रोत्साहन देणारे असतात. यात सहभाग होणार्‍याला अतिशय भयंकर हिंसक असे व्हिडीओज, प्रतिमा अथवा अ‍ॅनिमेशन्स पाठविले जाते. यातून त्याला ब्रेनवॉश करून हिंसक कृत्यासाठी तयार केले जाते. यामुळे हा गेम खेळणारा हळूहळू आत्मनाशाच्या मार्गावर प्रचंड गतीने आगेकूच करू लागतो. यातून अर्जेंटीनात अलीकडेच एका तरूणीचा मृत्यू झाला असून यातूनच याची भयावहता समोर आली आहे.साधारणपणे स्पॅनीश भाषिक राष्ट्रांमध्ये मोमो चॅलेंजच्या घटना आढळून आल्या आहेत. तथापि, जपानसह काही युरोपिअन व आशियाई देशांमध्येही सायबरतज्ज्ञांना हा प्रकार दिसून आला आहे. यामुळे सतर्कता बाळगणे गरजेचे बनले आहे.

मोमो या नावाचे रहस्य काय

विख्यात जपानी शिल्पकार मिदोरी हयाशी यांनी मोमो या नावाने एक शिल्प तयार केलेले आहे. यातील शरीर हे पक्षाचे असून यावर एका अत्यंत भेसूर चेहर्‍याच्या महिलेचे तोंड लावण्यात आलेले आहे. जपानमध्ये हे शिल्प आधीच परिचयाचे झाले आहे. यावरूनच मोमो चॅलेंज हा आत्मघातकी गेम तयार करण्यात आलेला आहे. यासाठी मोमोची भयावह प्रतिमा (क्रॉप करून) वापरण्यात आलेली आहे. अर्थात या गेमशी मिदोरी हयाशी यांचा कोणताही संबंध नसून फक्त त्यांच्या शिल्पाचा वापर अत्यंत विकृत पध्दतीने करण्यात आल्याची बाब येथे लक्षात घ्यावी लागणार आहे. (तसेच मोमो नावाच्या लोकप्रिय मॅसेंजरचाही याच्याशी कोणताही संबंधीत नाहीय!) ही प्रतिमा गेम खेळणार्‍याला आज्ञा देणार्‍या व्हाटसअ‍ॅपच्या अकाऊंटवर प्रोफाईल फोटो म्हणून वापरण्यात आलेली आहे. यामुळे या चेहर्‍याने जगभरात एकच खळबळ उडवून दिली आहे.

या गेमच्या जाळ्यात कुणीही कसा अडकतो

ब्ल्यू व्हेल चॅलेंजमध्ये वेबसाईट, मॅसेंजर, चॅटींग ग्रुप्स आदींच्या माध्यमातून सूत्रधार कार्यरत असे. मोमो चॅलेंज गेममध्ये मात्र विशिष्ट क्रमांकावरून सूत्रधार काम करत असतो. म्हणजे या क्रमांकाच्या व्हाटसअ‍ॅप अकाऊंटवर जाऊन मॅसेज केल्यानंतरच हा गेम खेळता येतो. कुणीही उत्कंठेसाठी असल्या प्रकारचा मॅसेज करताच या अकाऊंटवरून त्या व्यक्तीला व्हाटसअ‍ॅपवर अतिशय भयंकर व हिडीस असे व्हिडीओज, मॅसेजेस व इमेजेस येऊ लागतात. यातूनच त्या व्यक्तीला विविध टास्क दिले जातात. यातील सर्व टास्क हे हिंसेला प्रोत्साहित करणारे असतात. हे सर्व टास्क पूर्ण करण्याचे चॅलेंज त्या गेमरला असते. यामुळे तो हळूहळू हिंसेच्या मार्गाला लागतो. यातील सर्वात शेवटचे टास्क हे अर्थातच आत्महत्येचे असते. यातील कोणतेही ‘टास्क’ पूर्ण केले नाही वा त्यात दिरंगाई केल्यास भयावह मॅसेज टाकून त्या गेमरला धमकावले जाते. त्याची गोपनीय माहिती जाहीर करण्याची ब्लॅकमेंलीगदेखील केली जाते. यामुळे तो गेमर एका चक्रव्यूहात अडकला जातो. यातून अर्जेंटीनात एका मुलीचा मृत्यू झाला असून अन्य काही संशयास्पद मृत्यूदेखील याच गेममुळे झाल्याचा संशय आहे. तर अनेक जणांना या गेमपासून परावृत्त करण्यात आले आहे.

यापासून बचाव कसा होणार

कोणत्याही आमिषापासून वाचायचे असल्यास ‘मनाचा ब्रेक,उत्तम ब्रेक’ हे ब्रीद वाक्य खूप उपयोगात पडते. ब्ल्यू व्हेल चॅलेंजमध्येही मानसशास्त्रांनी हेच सांगितले होते. मोमो चॅलेंजमध्येही याचीच पुनरावृत्ती झाली आहे. जगात अनेक जण उत्सुकतेपोटी अनामिक व्हाटसअ‍ॅप अकाऊंटवर मॅसेज दिल्यानंतर या चक्रव्यूहात अडकत असल्याचे दिसून आले आहे. यातील ८१ क्रमांकापासून सुरू होणारे जपानी, ५२ क्रमांकापासून सुरू होणारे कोलंबियन तर ५७ या क्रमांकापासून सुरू होणार्‍या मेक्सिकन देशांमधील व्हाटसअ‍ॅपचे काही अकाऊंट संशयास्पद आढळले असून त्यांची झाडाझडती सुरू करण्यात आली आहे. यात एखादा नंबर ब्लॉक केला तर लागलीच दुसर्‍या क्रमांकावरून हे घातक मॅसेज पसरवण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

तथापि, मोमो चॅलेंज गेम म्हणजे सावजाने आपणहून जाळ्यात अडकवून घेण्याचा प्रकार आहे. यामुळे कुणीही मनाशी दृढ निश्‍चय केल्यास तो या गेमच्या आमिषात कधीही फसणार नाही. आणि फसला तरी तो यातून अगदी सहीसलामत बाहेर पडू शकतो. यामुळे यापासून घाबरण्याची जराही आवश्यकता नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे व्हाटसअ‍ॅपवर कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून भयसूचक व्हिडीओ वा प्रतिमा आल्यास त्या क्रमांकाला तातडीने ब्लॉक करून पोलिसात सूचना देणे हे केव्हाही उत्तम. अशा अकाऊंटवरून येणार्‍या लिंकमध्ये घातक व्हायरसची शक्यतादेखील असल्यामुळे थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन

News Desk

अमेरिकेत कोरोनावर आळा घालण्यासाठी ट्रम्प यांनी आखली ‘३ फेज’ची योजना

News Desk

एअर इंडिया अधिकृतरित्या टाटा समूहाकडे स्वाधीन

Aprna