HW News Marathi
देश / विदेश

ऐकावे ते नवलच ! आंध्र प्रदेशात ५ उपमुख्यमंत्री

नवी दिल्ली | आंध्र प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री वायएसआर काँग्रेस जगन मोहन रेड्डी यांनी यांच्या मंत्रिमंडळात पाच उपमुख्यमंत्री नेमण्याचे ठरवले आहे. हे पाच उपमुख्यमंत्री प्रत्येकी एससी, एसटी, बीसी, अल्पसंख्याक आणि कापू समाजातून असणार आहेत. वायआरएस काँग्रेसच्या आमदारांची आज (७ जून) बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतला आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे पाच उपमुख्यमंत्री नेमण्यात येणार आहेत.

वायएसआर काँग्रेसच्या ताडेपल्ले येथील कार्यालयात आज मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व आमदारांची एक बैठक पार पडली. यावेळी २५ कॅबिनेट मंत्र्यांचा शनिवारी शपथविधी होईल हे जाहीर करण्यात आले. तसेच अडीच वर्षांनी कॅबिनेटमधील मंत्रिपदे बदलण्यात येतील असेही यावेळी रेड्डी यांनी सांगितले.

आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीबरोबरच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसने आंध्रप्रदेशमध्ये १७५ पैकी १५१ जागांवर विजय मिळवला. तर लोकसभेच्या २५ पैकी २२ जागांवर विजय मिळल्या. तर अभिनेता पवन कल्याण यांच्या पक्षाला एका जागेवर विजय मिळविण्यात यश आले. २०१४ मध्ये टीडीपीने १०२ जागांवर विजय मिळवून सरकार स्थापन केले होते. तर वायएसआर काँग्रेसला ६७ आणि भाजपला ४ जागा मिळाल्या होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंडोनेशियात भूकंप आणि त्‍सुनामीमुळे हाहाकार

News Desk

जम्मू-कश्मीर निवडणुकीदरम्यान जवान-दहशतवाद्यांमध्ये चकमक

Gauri Tilekar

भाजपात शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांनो छत्रपतींची बदनामी तुम्हांला मान्य ? राऊतांचा सवाल ..

Arati More