HW News Marathi
देश / विदेश

Union Budget 2021 | सोने आणि चांदी स्वस्त होणार

नवी दिल्ली | आज (१ फेब्रुवारी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेपरलेस अर्थसंकल्प असणार आहे. या अर्थसंकल्पाची स्फॉट कॉपी असणार आहे. अर्थसंकल्पाच्या सुरुवातीला निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकारच्या या काळात काय काय गोष्टी लोकांना दिल्या त्या सविस्तरपणे सांगतल्या. मोदी सरकारने आत्मनिर्भर भारतला सुरुवात केली त्याचे फायदेही यावेळी त्यांनी सांगतिले.

२९ जानेवारी पासून सुरु झालेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या कडून सकाळी ११ वाजता देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षीचा अर्थसंकल्प ऐतिहासिक असणार आहे. कारण हा अर्थसंकल्प कोरोनामुळे मोडकळीस आलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला तारणारा ठरणारा का याकडे सामान्यांसह सर्व देशाचे लक्ष लागले आहे. या वर्षी कोरोनाच्या पाश्वभूमीवर पेपरलेस अर्थसंकल्प सादर केला जात आहे.

निर्मला सीतारामण यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे –

सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात येणार

सोलर उत्पादनांवरील कस्टम ड्युटी वाढवली जाण्याची शक्यता

भारतातील सोलर उपकरणांमध्ये वाढ व्हावी म्हणून आयात होणाऱ्या उपकरणांवरील कस्टम ड्युटी वाढवण्यात येणार

मोबाईलवरील कस्टम ड्युटी वाढून २.५ टक्क्यांवर

स्टील उपकरणांवरील कस्टम ड्युटी कमी होऊन ७.५ टक्क्यांवर

कॉपरवरील कस्टम ड्युटी कमी होऊन २.५ टक्क्यांवर

नायलॉनवरील कस्टम ड्युटी कमी होऊन ५ टक्क्यांवर

सोलर इन्व्हर्टरवरील कस्टम ड्युटी २० टक्क्यांवर

निवडक ऑटो पार्टवरील कस्टम ड्युटी वाढवून १५ टक्क्यांवर

कस्टम ड्युटीला पेपरलेस करण्याची तयारी

परवडणाऱ्या घरांवरील व्याज मर्यादेत सूट वाढली

ही सूट एक वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे,

परवडणारी घरं आणि भाड्याची घरांवर जुलै २०१९ मध्ये १.५ लाख व्याजावर करात सूट देण्यात आली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खासदार महिला सुद्धा कास्टिंग काऊचपासून अपवाद राहिल्या नाही

Adil

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सरकारला ‘ऑपरेशन लोटस’चा धोका

News Desk

४०० वर्ष जुन्या वटवृक्षाला वाचवण्यासाठी पर्यावरण मंत्र्यांचे केंद्रीय परिवहन मंत्र्यांना पत्र

News Desk