HW Marathi
देश / विदेश

आयटी रिटर्न्स भरण्याकरिता पॅनकार्ड-आधारकार्ड लिंक करणे अनिवार्यच

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने आयटी रिटर्न्स भरण्याकरिता पॅनकार्ड आणि आधारकार्ड एकमेकांशी लिंक करणे अनिवार्य असल्याचे बुधवारी (७ फेब्रुवारी) स्पष्ट केले आहे. दिल्ली न्यायालयाने श्रेया सेन आणि जयश्री सातपुते या दोन जणांना पॅनकार्ड-आधारकार्ड लिंक नसतानाही आयटी रिटर्न्स भरण्याची परवानगी दिली होती. याविरोधात केंद्राने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने यावर बुधवारी सुनावणी केली असून आयकर कायद्याचे कलम १३९ एए ग्राह्य धरत आयकर रिटर्न्स भरण्यासाठी पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे. न्या. ए. के. सिक्री, एस. अब्दुल नाझीर यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली.

Related posts

2007 Hyderabad Twin Blasts Case | एनआयए स्पेशल कोर्टाने आरोपींना ठरवले दोषी

News Desk

निवडणूक आयोगाने ‘नमो टीव्ही’वर लावलेली बंदी हटवली

News Desk

जिथं रोखलं होतं, तिथंच कोविंद सन्मानानं जाणार ?

News Desk