HW Marathi
देश / विदेश राजकारण

पुढचे ३ महिने नागरिकांना गहू २, तर तांदूळ ३ रुपये प्रति किलोने मिळणार

नवी दिल्ली | देशात वाढत जाणारा ‘कोरोना’चा प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान मोदींनी पुढच्या २१ दिवसांसाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी केला आहे. दरम्यान, जरी देशात लॉकडाऊन असले तरीही नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवा-सुविधा उपलब्ध असतील. त्याच कोणत्याही अडीअडचणी निर्माण होणार नाहीत, अशीही ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने देशातील सर्वसामान्यांना स्वस्त दरांत अन्नधान्य पुरवण्याची घोषणा केली आहे. आता रेशन केंद्रावर नागरिकांना गहू २ रुपये प्रतिकिलो तर तांदूळ ३ रुपये प्रतिकिलोने उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती केंद्रीय कॅबिनेट मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या पत्रकार परिषदेत दिली.

“देशातल्या ८० कोटी जनतेला पुढील ३ महिने स्वस्त दरात अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. एका व्यक्तीला प्रत्येकी ७ किलो रेशन देण्यात येईल. यात गहू २ रुपये प्रतिकिलो, तर तांदूळ ३ रुपये अशा दराने दिला जाईल”, अशी माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. “लॉकडाऊनच्या काळातही देशात सर्व अत्यावश्यक सेवा सुरु राहतील त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊन नागरिकांनी घराबाहेर पडू नये. पुढचे २१ दिवस आपण सर्वांनी घरातच राहणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, आपल्याला अत्यावश्यक सुविधा पुरवणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये याची प्रत्येकानेच काळजी घ्यायला हवी”, असे आवाहन देखील प्रकाश जावडेकर यांनी केले आहे.

Related posts

ए. राजा मनमोन सिंग, विनोद राय यांच्यावर गंभीर आरोप

Ramdas Pandewad

शिवसेनेने उत्तर प्रदेशासाठी जाहीर केली ५ उमेदवारांची यादी

News Desk

#Results2018 : चंद्रशेखर राव ५० हजार मतांनी विजयी

News Desk