ढाका | भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना आणखी एका प्रकरणात सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. झिया चॅरिटेबल ट्रस्टच्या भ्रष्टाचाराशी संबंधित आहे. तसेच झिया यांना १० लाख रुपयांचा दंडही ठोठवला असून दंड न भरल्यास ६ महिन्यांचा अधिक कारावास ठोठावण्यात येईल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे झिया यांना यंदा डिसेंबर महिन्यात होणारी सार्वत्रिक निवडणूक लढवता येणार नाही.
Former Bangladesh Prime Minister Khalida Zia and three others were sentenced to seven years in prison in connection with Zia Charitable Trust graft case
Read @ANI story | https://t.co/4YCyFRRxhJ pic.twitter.com/X8K3TYY8pX
— ANI Digital (@ani_digital) October 29, 2018
खालिदा झिया (वय ७३) गेल्या फेब्रुवारीपासून अनाथालयातील निधी अपहार प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. त्यांना या प्रकरणी यापूर्वीचआधीच पाच वर्षाची शिक्षा सुनावली होती. बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी अर्थात ‘बीएनपी’च्या अध्यक्ष असलेल्या बेगम खलिदा झिया या १९९१-९६ आणि २००१ ते २००६ या कालावधीत पंतप्रधान होत्या. या प्रकरणात खालिदा झिया आणि त्यांचा मोठा मुलगा तारिक रहमान याच्यासह पाच लोकांवर २००१ से २००६ दरम्यान बांगलादेश पंतप्रधान पदावर असताना २ लाख ५३ हजार डॉलर रकमेचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.