नवी दिल्ली | दिल्ली काँग्रेस अध्यक्षा आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे दीर्घ आजाराने शनिवारी (२० जुलै) दुपारी ३.३० वाजता निधन झाले आहे. त्या ८१ वर्षांच्या होत्या. दिल्लीच्या एस्कॉर्टस रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने शीला दीक्षित यांचे निधन झाल्याची माहिती मिळत आहे. शनिवारी सकाळीच त्यांना रुग्णालायत दाखल करण्यात आले होते. दरम्यान, शीला दीक्षित यांनी सलग ३ वेळा दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. शीला दीक्षित या सर्वाधिक काळ दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी राहिल्या आहेत. १९९८ सालापासून २०१३ पर्यंत म्हणजेच तब्बल १५ वर्षे शीला दीक्षित या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. तर सध्या त्यांच्याकडे दिल्ली काँग्रेसची संपूर्ण जबाबदारी होती.
Former Delhi Chief Minister & Congress leader Sheila Dikshit, passes away in Delhi at the age of 81 years. (file pic) pic.twitter.com/8rqv8qfnAQ
— ANI (@ANI) July 20, 2019
सविस्तर वृत्त लवकरच…
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.