नवी दिल्ली । माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे आज (६ ऑगस्ट) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्या किडनीच्या प्रदीर्घ आजाराने ग्रस्त होत्या. थोड्याच वेळापूर्वी सुषमा स्वराज यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर, ५ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत होती
राजकीय परिचय
सुषमा स्वराज या १९७७ साली वयाच्या अवघ्या २५ वर्षी हरियाणातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री बनल्या होत्या. सुषमा स्वराज यांनी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारणमंत्री, दूरसंचारमंत्री, आरोग्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री म्हणून काम केले होते.सुषमा स्वराज यांनी १३ ऑक्टोबर १९९८ ते ३ डिसेंबर १९९८ या काळात दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषविले.२१ डिसेंबर २००९ ते २६ मे २०१४ या काळात त्या लोकसभेत विरोधी पक्षनेत्या राहिल्या आहेत २०१४ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्या दुसऱ्या वेळेस मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघातून जिंकून आल्या होत्या. मोदी सरकारच्या पहिल्या कालखंडात २०१४ ते २०१९ या कार्यकाळात सुषमा स्वराज या परराष्ट्रमंत्री म्हणून कार्यरत होत्या.
Sushma Ji’s demise is a personal loss. She will be remembered fondly for everything that she’s done for India. My thoughts are with her family, supporters and admirers in this very unfortunate hour. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) August 6, 2019
Former External Affairs Minister & senior BJP leader, Sushma Swaraj, passes away. pic.twitter.com/4L59O73xQU
— ANI (@ANI) August 6, 2019
अवघ्या ३ तासांपूर्वी ३७० कलम रद्द करण्याचा मोदी सरकारचा निर्णय लोकसभेत मंजूर झाल्यानंतर सुषमा स्वराज यांनी आनंद व्यक्त करत एक ट्विट केले होते. “मी जीवनात याच दिवसाची वाट पाहत होते. मोदीजी या निर्णयाबाबत आपलं अभिनंदन”, अशा आशयाचे ट्विट सुषमा स्वराज यांनी केले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.