HW News Marathi
देश / विदेश

अरुण जेटली यांची प्रकृती चिंताजनक

नवी दिल्ली | देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. जेटली यांना व्हेंटिलेटरवरून आता एक्स्ट्राकोर्पोरियल मेंब्रेन ऑक्सिजनेशन (इसीएमओ) आणि इंट्रा ऑटिर्क बलून सपोर्ट (आयएबीपी) सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. ही पायरी व्हेंटिलेटरच्या पुढची मानली जाते.

जेटली यांना शुक्रवारी (९ ऑगस्ट) श्वसनास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल केले. परंतु एम्सने जेटलींच्या प्रकृतीविषयी १० ऑगस्टपासून कोणतेही मेडिकल बुलेटिन जारी केलेले नाही. रविवारी (१८ ऑगस्ट) आरएसएस प्रमुख मोहन भागवत, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, राम विलास पासवान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी एम्समध्ये जाऊन अरुण जेटली यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एम्समध्ये जाऊन जेटलींच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. जेटली हे गेल्या अनेक दिवसांपासून सॉफ्ट टिशू सरकोमा या प्रकाराच्या कॅन्सरने त्रस्त आहेत. तसेच ते मधुमेहाचेही रुग्ण असून त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपण करण्यात आले आहे. सॉफ्ट टिशू कॅन्सरचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर अमेरिकेत उपचार करण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दहशतवाद नष्ट करण्यास भारत पाकिस्तानला हवी ती मदत करण्यास तयार !

News Desk

पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून संबोधन !

News Desk

“पश्चिम बंगालच्या निवडणूकीवर देशाच्या राजकारणाची वाटचाल अवलंबून”, राऊतांचे सूचक भाष्य

News Desk