श्रीनगर | काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० आणि कलम ३५ अ हटवण्याबाबतचा विधेयक संसदेत मांडला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल (५ ऑगस्ट) राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर आज लोकसभेत मांडले आहे. हे विधेयक संसदे मांडण्यापूर्वी सरकारने काश्मीरमध्ये संचार बंदी लागू केली होती. तर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल काँफ्रन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, त्यांचा मुलगा ओमर अब्दुला आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना रविवार (४ ऑगस्ट) नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
Farooq Abdullah: As soon as the gate will open & our people will be out, we will fight, we’ll go to the court. We’re not gun-runners, grenade-throwers, stone-throwers, we believe in peaceful resolutions. They want to murder us. My son (Omar Abdullah) is in jail https://t.co/Dxz4MGGOiX
— ANI (@ANI) August 6, 2019
कलम ३७० हटविल्याच्या चर्चेवर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल काँफ्रन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्या अनुपस्थितीवर प्रसारमाध्यामांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी दिलेली पहिल प्रतिक्रिया “मला अटक करण्यात आली नाही, मला माझ्या घरात नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Farooq Abdullah, National Conference in Srinagar: Why would I stay inside my house on my own will when my state is being burnt, when my people are being executed in jails? This is not the India I believe in. #JammuAndKashmir pic.twitter.com/cUD4rgTaer
— ANI (@ANI) August 6, 2019
अब्दुला असे देखील म्हणाले की, आम्ही लवकरात लवकर आमच्या लोकांना कैदेतून सुटका करणार असून यानंतर सरकारच्या या निर्णायविरोधात आम्ही न्यायालयात धाव घेणार आहे. आम्ही ग्रेनेड फेकणारे आणि दगड फेकणारे नाहीत. यावर आम्हाला शांततेच्या मार्गाने तोडगा काढायचा होता. माझे कुटुंबिय सध्या संकटात असून माझा मुलगा ओमर आब्दुला तुरुंगात आहे. सरकारने काश्मीरच्या जनतेला दगा दिला असून सरकारने कलम ३७० हटवून आमची हत्येचा कट रचल्याचे अशी टीका अब्दुला सरकारवर टीका केली आहे
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.