HW News Marathi
देश / विदेश

सीसीडीचे मालक आणि कर्नाटकाच्या माजी मुख्यमंत्र्यांचे जावाई बेपत्ता

बेंगळूर | कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थ हे सोमवारपासून (२९ जुलै) बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे. सिद्धार्थ हे प्रसिद्ध कॅफे चेन सीसीडी अर्थात कॅफे कॉफी डे चे मालक आहेत. सिद्धार्थ हे सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास कारने प्रवास करत मंगळुरू येथील नेत्रावती नदीच्या परिसरात गेल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे कर्नाटक पोलिसांकडून नदी आणि त्यांच्या जवळपासचा सर्व परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, काँग्रेस नेते डीके शिवकुमार, बीएस शंकर हेदेखील एस. एम. कृष्णा यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. सोमवारपासून बेपत्ता असलेल्या सिद्धार्थ यांचा फोनही बंद येत असल्याची माहिती मिळाली आहे. सिद्धार्थ सोमवारी संध्याकाळी नेत्रावती नदीच्या पुलाजवळ कारमधून उतरले. सिद्धार्थ यांनी त्यांच्या ड्रायव्हरला लवकर येतो असे सांगितले. ड्रायव्हरने हे अर्धा तास त्यांची वाट पाहिली पण सिद्धार्थ परत आलेच नाहीत. तसेच त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा फोन बंद आला. त्यामुळे ड्रायव्हरने सिद्धार्थ यांच्या घरी फोन करून ते बेपत्ता असल्याची आतापर्यंत मिळाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शालेय मुलीची छेड काढणारा सीआरपीएफ जवान अटकेत

News Desk

सामान्य जनताही वेळ येताच सगळा हिशेब ‘चुकता’ करीत असते, सेनेचा केंद्राला इशारा

News Desk

#Coronavirus : संसदेत वित्त विधेयक मंजुरीनंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळले

swarit