HW News Marathi
Covid-19

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली | देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशात निर्माण झालेल्या महामारीच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिलं होतं. अशा परिस्थितीत त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांना दिल्लीतील AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते

देशामध्ये वाढणारा कोरोनाचा संसर्ग पाहून यावर उपाययोजना सुचवणारा पाच कलमी कार्यक्रम माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे दिला होता. अमेरिका, युरोपीय देशांनी ज्या लसींना मंजुरी दिली आहे अशा लसींचा समावेश आपल्या देशातील लसीकरण मोहिमेत करून कोरोनावरील लसीकरण मोहिमेला गती देण्याची गरज आहे. अशा महत्त्वाच्या सूचना या पाच कलमी कार्यक्रमाद्वारे पंतप्रधानांना मनमोहन सिंग यांनी केल्या आहेत.

मनमोहन सिंग यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोनावरील लसीची गती आणखी वाढवावी लागेल. कारण कोरोनावरील उपचारासाठी हे महत्त्वाचे आहे. किती लोकांचे लसीकरण झाले यापेक्षा लोकसंख्येच्या किती टक्के लसीकरण झाले आहे हे महत्त्वाचे आहे. तसेच ४५ वर्षांहून कमी वयाच्या लोकांनादेखील लसीकरण करण्यात यावे म्हणजे ज्यांचे वय ४५ पेक्षा कमी आहे पण हे आरोग्य कर्मचारी आहेत, शिक्षक, बस, टॅक्सीचालक आहेत त्यांनासुद्धा प्राधान्याने लस दिली पाहिजे, असे मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्राद्वारे सुचवले आहे.

– पुढील सहा महिन्यांसाठी किती लसींची ऑर्डर दिली आहे हे जाहीर करावे.

– राज्यांना अपेक्षित असलेला साठा कसा पुरवला जाईल याबाबत संकेत द्यावेत.

– राज्यांना प्रंटलाइन वर्कर्सची श्रेणी ठरवण्यासाठी सूट द्यायला हवी.

– वापरासाठी परवानगी दिलेल्या कुठल्याही लसीच्या आयातीसाठी परवानगी द्यावी, या पाच मुद्दय़ांचा या पत्रामध्ये समावेश आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतात १६ जानेवारीपासून जगातील सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाला होणार सुरुवात | पंतप्रधान

News Desk

सर्व ज्येष्ठ नागरिकांनी बूस्टर डोस घेण्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आवाहन

Aprna

जाणून घ्या… अ‍ॅमझॉन-फ्लिपकार्टवरील वस्तूंची डिलिव्हरी कोणत्या झोनमध्ये होणार

News Desk