छत्तीसगड | छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे चार जवान शहीद झाले आहेत. तर दोन जखमी झाले आहेत.
Four Central Reserve Police Force (CRPF) jawans have lost their lives in an encounter with Naxals in Bijapur. Two jawans are injured. More details awaited. #Chhattisgarh pic.twitter.com/Mrb7IobEFJ
— ANI (@ANI) October 27, 2018
नक्षली हल्ल्यात शहीद झालेले जवान सीआरपीएफ-168 बटालियनचे होते. सीआरपीएफचे जवान नक्षलवाद्यांच्या शोधार्थ बाहेर पडलेले असताना बासागुडा भागातील मुर्दोण्डा गावाजवळ ही चकमक झाली, अशी माहिती सीआरपीएफचे एएसपी दिव्यांग पटेल यांनी दिली. दंतेवाडा जिल्ह्यातील छोलनार आणि किरंडूल गावांच्या परिसरात पोलीस व सशस्त्र दलाचे जवान एकत्रपणे नक्षलवाद्यांचा शोध घेत असताना, हा स्फोट घडवून आणला होता. सशस्त्र दलाचे पाच जवान आणि जिल्हा पोलीस दलाचे दोघे असे सात जण शहीद झाले होते.
दरम्यान, छत्तीसगडमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला असल्याचे म्हटले आहे विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाली असून राज्यात आचार संहिता लागू करण्यात आली आहे. विधानसभेच्या १८ जागांसाठी पहिल्या टप्प्यात १२ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ७२ जागांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.