HW News Marathi
देश / विदेश

ब्रिटनमधील भीषण अपघातात ४ भारतीय ठार

लंडन ब्रिटनमधील भीषणस्ते अपघातात चार भारतीय जागी ठार झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे.

शनिवारी सकाळी बकिंगहॅमशायरमधील न्यूपोर्ट पॅगनेल येथे विप्रो कंपनीच्या आयटी अभियंत्यांना घेऊन जाणारी मिनीबसची दोन लॉरींना धडकली. यात विप्रोचे ३ कर्मचारी जागीच ठार झाले तर चौथा गंभीर जखमी आहे.तसेच अपघातात ठार झालेला सिरीअॅक जोसेफ हा बसचालकही भारतीय होता. दोन्ही लॉरीचालकांना घटनास्थळीच अटक करण्यात आली आहे. या दोघांपैकी एकावर ड्रंक अॅण्ड ड्राइव्हचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सोमवारीदोघांना युके कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे.

कार्तिकेयन रामसुब्रमण्यम पुगलर, ऋषी राजीव कुमार आणि विवेक भास्करन अशी मृत्यू झालेल्या आमच्या तीन कर्मचाऱ्यांची नावं आहेत,’ असं विप्रोचे युकेचे ऑपरेशन्स हेड रमेश फिलीप्स यांनी सांगितलं. या भीषण अपघातात मनो रंजन पन्नीरसेल्वम या आमचा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे, असंही फिलीप्स म्हणाले. लॉरी आणि एका ट्रकला धडकल्यानंतर या १६ आसनी मिनीबसचा चुराडा झाला. बसमध्ये चालकासह १२ भारतीय होते. हे सर्व केरळ आणि तामिळनाडूचे रहिवासी आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विकासाला नवी चालना देणारे नितीन गडकरी, स्वयंसेवक ते केंद्रीय मंत्री

News Desk

BYJU कडून नीरज चोप्राला 2 कोटींची भेट!

News Desk

महाविकासआघाडी अन् भाजपमध्ये पुन्हा जुंपली, संदीप सिंहवरुन अनेक सवाल उपस्थित 

News Desk