श्रीनगर | जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील राजपोरा येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी (२९ डिसेंबर) पहाटेपासून चकमक सुरू झाली आहे. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. राजपोरा भागात दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्याचप्रमाणे या भागाला देखील घेराव घालण्यात आला असून शोधमोहीम अद्याप सुरु आहे.
#UPDATE Four terrorists have been killed.Arms and ammunition recovered https://t.co/23BX6oZUie
— ANI (@ANI) December 29, 2018
Low-intensity blast at a bus stand in Jammu earlier today. No casualties or injuries have been reported. pic.twitter.com/7G8zyDM8XT
— ANI (@ANI) December 29, 2018
दरम्यान, जम्मूमधील बस स्टँडवर काल (२८ डिसेंबर) मध्यरात्री एक ग्रेनेड स्फोट झाला असून या स्फोटामुळे परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर संपूर्ण परिसरात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान या स्फोटामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.