नवी दिल्ली | भारत-पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले गेले असताना देखील पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन यांच्या मुक्ततेचा निर्णय घेतल्यानंतर देशभरातून समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र, पाकिस्तानच्या सीमारेषेवरील कुरघोड्या अजूनही थांबलेल्या नाहीत. पाकिस्तानच्या रेंजर्सकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. कुपवाडा येथे सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये आज (१ मार्च) ही चकमक झाली असून भारतीय सैन्याकडून याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. यावेळी २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास भारतीय सैन्याला यश आले आहे.
Jammu & Kashmir: Pakistan violated ceasefire at Gawahalan, Chokas, Kiker and Kathi posts in Uri sector last night. One civilian was injured and is currently in a hospital for treatment.
— ANI (@ANI) March 1, 2019
सुरक्षा यंत्रणांना सीमा परिसरात काही दहशतवादी घुसल्याची माहिती शुक्रवारी सकाळी मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधमोहीम सुरु केली. भारतीय वायू दलाच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून सीमारेषेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. पाकिस्तानकडून गुरुवारी (२८ फेब्रुवारी) देखील शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पूंछ जिल्ह्यातील कृष्णाघाटी सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला होता. दरम्यान, प्रत्येकवेळी भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ताणले गेलेले भारत-पाकिस्तान संबंध, पाकिस्तानच्या कुरघोड्या यामुळे आंतरराष्ट्रीय दबाव आणि भारताच्या कठोर कारवाईमुळे पाकिस्तानने नमते घेतल्याचे म्हटले जात आहे. परंतु, एकीकडून शांततेचा मार्ग अवलंबायचा आणि दुसरीकडे कुरघोड्या चालूच ठेवायच्या असा प्रकार पाकिस्तानकडून सुरु आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.