जयपूर | दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. या इंधन दरवाढीमुळे समान्यांचे कंबरडे मोडले आहे. ”पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती काय आहेत, याने मला काहीही फरक पडत नाही. माझ्या वाहनांमध्ये पेट्रोल आणि डिझेल सरकारकडून भरले जाते. माझे मंत्रिपद गेल्यानंतर कदाचित मला महागाईची झळ बसू शकते”, असे वादग्रस्त विधान सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. आठवले यांनी शनिवारी जयपूर येथे इंधन दरवाढी विरोधात असे बेताल वक्तव्य केले आहे. आठवले यांच्या या विधाननंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
I'm not suffering from rising fuel prices as I am a minister. I may suffer if I lose my ministerial post. It's understandable that people are suffering from rising fuel prices & it's the duty of the govt to reduce them: Union Minister Ramdas Athawale in Jaipur #Rajasthan. (15.09) pic.twitter.com/H4F7e7Zhqt
— ANI (@ANI) September 15, 2018
एका बाजूला सामान्य जनतेला इंधन दरवाढीची झळ बस आहे. तर दुसऱ्या बाजुला सत्तेधाऱ्यांच्या अशा बेताल वक्तव्यांनी सामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आजही (१६ सप्टेंबर) दरवाढ कायम आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात २८ पैसे म्हणजे प्रति लिटर ८१.९१ रुपये एवढे झाले आहे. तर डिझेल १८ पैसे झाले असून प्रति लिटर डिझेल ७३.७२ रुपयाने महागले आहे.
Petrol at Rs 81.91/litre (increase by Rs 0.28/litre) and diesel at Rs 73.72/litre (increase by Rs 0.18/litre) in Delhi. Petrol at Rs 89.29/litre (increase by Rs 0.28/litre) and diesel at Rs 78.26/litre (increase by Rs 0.19/litre) in Mumbai. pic.twitter.com/sTBpMOHzDC
— ANI (@ANI) September 16, 2018
तर दिल्लीत पेट्रोलचे दर २८ पैसे म्हणजे प्रति लिटर ८९ रुपये आणि डिझेलचे दर १९ पैसे ७८.२६ एवढे पैरुपये मोजावे लागत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता अक्षराश: मेटाकुटीला आली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.