HW News Marathi
Uncategorized

सिलिंडर आता रेशन दुकानांवर!

दिल्ली | मोदी सरकारने गॅस सिलेंडरच्या बाबतीत नुकताच मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार रेशन दुकानातून छोट्या एलपीजी सिलिंडरच्या किरकोळ विक्रीला परवानगी देण्याचा विचार करत आहे. याचबरोबर, सरकार या स्वस्त धान्य दुकानांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याकरिता आर्थिक सेवा देण्याची योजना आखत आहे.

धान्य दुकानांद्वारे करण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील

अन्न सचिव सुधांशू पांडे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारांशी झालेल्या व्हर्चुअल बैठकीमध्ये या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. निवेदनात दिलेल्या माहितीनुसार की, “स्वस्त धान्य दुकानांची FPS आर्थिक व्यवहार्यता वाढवण्याकरिता सक्रिय उपाययोजना केले पाहिजेत. लहान एलपीजी सिलिंडरची एफपीएसद्वारे किरकोळ विक्री करण्याच्या योजनेवर विचार केला जात आहे. पेट्रोलियम मार्केटिंग कंपन्यांच्या OMCs प्रतिनिधींनी लहान एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री स्वस्त धान्य दुकानांद्वारे करण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला जात आहे.

स्थानिक गरजांनुसार नफ्याचा आढावा घेण्याकरिता सीएससी बरोबर समन्वय साधणार आहेत. भांडवल उभारणीकरिता मुद्रा कर्जाचा लाभ एफपीएस डीलर्सना देण्याचा सरकारचा विचार करत आहे, असे निवेदनात सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतीय महिलांचा आत्मविश्वास कमी पडला

News Desk

सोनियांची प्रकृती खालावली

News Desk

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सिध्दांत आणि व्यवहार’ विषयावर चर्चासत्र

News Desk