जम्मू काश्मीर | जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालपदी भाजपा नेते आणि माजी मंत्री मनोज सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जीसी मूर्मू यांनी त्यांचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे सुपूर्द केला आहे. काल (५ ऑगस्ट) मूर्मू यांनी आपल्या उपराज्यपाल पदाचा राजीनामा दिला होता.
काल संध्याकाळी गिरीष चंद्र मूर्मू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ५ ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याला एक वर्ष पूर्ण झाले होते. मूर्मू यांनी ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालपदाची शपथ घेतली होती. त्यांच्या कार्यकाळात काश्मीर शांतता, स्थिरता आणि विकासाच्या मार्गावर पुढे गेल्याचे सांगण्यात आले.
President accepts GC Murmu's resignation, appoints Manoj Sinha as new J-K Lt Guv
Read @ANI Story | https://t.co/FjjNZhCd3K pic.twitter.com/oXDPBaUOqQ
— ANI Digital (@ani_digital) August 6, 2020
मनोज सिन्हा हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहे. मनोज सिन्हा हे भाजपाचा मोठा चेहराही मानले जातात. २०१९ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळेच पुन्हा त्यांना मंत्रिमंडळात स्थान देता आलं नव्हतं. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांच्याकडे रेल्वे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी होती.
Manoj Sinha to be the new Lieutenant Governor of Jammu and Kashmir as President Kovind accepts the resignation of Girish Chandra Murmu. pic.twitter.com/QPS5D1jO8h
— ANI (@ANI) August 6, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.