गाझियाबाद | देशात सध्या कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. नुकतेच दिल्लीत निजामुद्दीन भागात तबलीगी समाजाचा ‘मरकज’ नावाचा धार्मिक कार्यक्रम पार पडला. यातून ३८० लोकांना कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यानंतर काही कोरोना संशयित तबलिकी समाजातील कार्यकर्त्यांवर उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील एमएमजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तबलिकी समाजातील लोकांनाी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन केल्याची धक्कादाय माहिती मिळाली आहे. या प्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ghaziabad: FIR has been registered against persons from Tablighi Jamat who are in quarantine at MMG District Hospital for 'walking around the ward without their trousers on and making lewd gestures towards the nurses'.
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 2, 2020
या तबलिकी समाजातील लोकांनी एमएमजी रुग्णालयातील नर्सेस समोरच हे लोक स्वत:चे कपडे काढत, असा आरोप रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केला आहे. यासंबधित लोकांची पोलिसांत तक्रार केल्यानंतर ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे तबलिकी समाजातील लोकांना तुरुंगात दाखल करण्याचा विचार जिल्हा प्रशासनन करत आहे.रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तबलीघी जमातशी निगडीत संशयित करोना रुग्ण रुग्णालयातल्या स्टाफसोबत अत्यंत चुकीच्या पद्धतीने वागत आहे. जमातचे काही लोक वारंवार अश्लील कृत्य करताना आढळले आहेत.
FIR has been registered on a complaint that patients admitted at hospital's (MMG District Hospital) isolation ward were misbehaving with hospital staff. It has been directed to ensure fair investigation in the matter: Kalanidhi Naithani, SSP Ghaziabad pic.twitter.com/GFlLraqVrb
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 2, 2020
छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे करत रुग्णालय डोक्यावर घेताना हे लोक दिसत आहेत. तबलिकी समाजातील लोकांच्या गैरवर्तनाने या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांना तुरुंगात किंवा बरॅकमध्ये टाकण्याचाही विचार सुरू आहे, अशी माहिती गाझियाबाद जिल्हा प्रशासनाने दिली आहे. यापूर्वी दिल्लीमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या समाजातील लोकांनी अंगावर थुंकणे किंवा आयसोलेशन सेंटरमध्ये वादंग निर्माण करणे अशा प्रकारची कृत्य केल्याने ‘जमात’चे कार्यकर्त्यांवर मोठी टीकाही झाली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.