HW News Marathi
देश / विदेश

भारतीय वंशाचा १२ वर्षीय मुलगा ठरला लंडनमध्ये ‘जिनिअस’

लंडन : भारतीय वंशाच्या केवळ १२ वर्षिय बालकाने एकेकाळी भारतावर सत्ता गाजविणाऱ्या ब्रिटिशांच्या देशात आपल्या बुद्धिमत्तेचा दबदबा निर्माण केला आहे. ब्रिटनमधील ‘चॅनेल ४’ या दूरचित्रवाहिनीची स्मरणशक्ती आणि सामान्यज्ञानावर आधारित स्पर्धा त्याने जिंकली आहे. राहुल दोशी असे या बालकाचे नाव असून तो ‘चाइल्ड जिनियस’ ठरला आहे.

लंडनमध्ये शिकणाऱ्या राहुलने शनिवारी रात्री झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत नऊ वर्षांच्या रोनन याचा १० विरुद्ध ४ असा पराभव केला. म्हणजे अंतिम फेरीत विचारलेल्या सर्व १० प्रश्नांची उत्तरे राहुलने अचूक दिली, तर रोननची फक्त चार उत्तरे बरोबर देता आली.

आठवडाभर चाललेल्या या स्पर्धेत एकूण २० स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात स्पर्धकांच्या स्मरणशक्तीसोबत गणित, इंग्रजी, इतिहास व इंग्रजी स्पेलिंगच्या ज्ञानाचा कस लागला.

एडवर्ड जेन्नरने वैद्यकीय क्षेत्रात लावलेले शोध हा राहुलने आवडीचा विषय म्हणून निवडला होता व त्यावरच त्याला सर्वाधिक प्रश्न विचारले गेले, पण त्याला खरा विजय मिळवून दिला, तो १९ व्या शतकातील विल्यम होलमन हंट आणि जॉन एवरेट मिलाईस या दोन कलावंतांशी संबंधित प्रश्नांच्या उत्तरांनी. राहुलचे वडील मिनेश आयटी मॅनेजर, तर आई कोमल फार्मसिस्ट आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

वंदे मातरम् गायले नाही म्हणून स्थानिकांची शिक्षकाला मारहाण

News Desk

इस्रायल-पॅलेस्टाईन वाद भडकला, हमासच्या हल्ल्याला इस्रायलचं जशास-तसं उत्तर

News Desk

आता तुम्ही ड्रोन उडवू शकता… पण या आहेत अटी

News Desk
देश / विदेश

डोक्याला चेंडू लागून पाकिस्तानी खेळाडूचा मृत्यू

News Desk

कराची – क्रिकेटच्या मैदानावर क्वचितच घडणारी दुर्दैवी घटना सोमवारी पाकिस्तानात घडली आहे. बॅटींग करीत असताना अचानक उसळलेला चेंडू डोक्यावर आदळल्याने एका खेळाडूचा मृत्यू झाला. झुबेर अहमद असे त्याचे नाव असून तो पाकिस्तानच्या फखर जमान अकादमीचा सदस्य होता. पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनीच त्याच्यावर काळाने घाला घातला.

पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी एका क्लब मॅचदरम्यान गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूच्या उसळीबाबत अंदाज न आल्याने चेंडू त्याच्या थेट डोक्यावर आदळला. हेल्मेट न घालता फलंदाजी करीत असल्यामुळे हा घाव त्याच्या वर्मी बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विट करून झुबेरच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केले आहे. खेळताना नेहमी हेल्मेट वापरावं आणि सुरक्षेची योग्य ती काळजी घ्यायला हवी हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असे पीसीबीने ट्विट करून म्हटले आहे.

क्रिकेट मैदानावरील जीवघेणे अपघात

– 2014 : देशांतर्गत सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलिप ह्यूज याचा डोक्यावर चेंडू आदळल्याने मृत्यू झाला होता.

-2012 : सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक मार्क बाऊचर याच्या डोळ्याला इजा. त्यानंतर त्याची क्रिकेटमधून निवृत्ती.

-2012 : झुल्फिकार भट्टी या पाकिस्तानी क्रिकेटपटूचा स्थानिक सामन्यात जिना स्टेडियमवर उसळता चेंडू छातीत लागला आणि त्याचा पिचवर मृत्यू झाला.

-1998 : भारताचा क्रिकेटपटू रमण लांबा शॉर्टलेगवर क्षेत्ररक्षण करताना चेंडू कानावर लागल्याने जखमी. उपचारांदरम्यान मृत्यू.

-1961-62 : भारताच्या नरी कॉण्ट्रॅक्‍टर यांना विंडीजच्या ग्रिपिथचा चेंडू डोक्‍याला लागला होता. तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. सुदैवाने कॉण्ट्रॅक्‍टर यांचा जीव वाचला, पण तो पुन्हा क्रिकेट खेळू शकले नाहीत.

-1958-59 : पाकिस्तानचा यष्टिरक्षक अब्दुल अझीज याला स्थानिक स्पर्धेत चेंडू छातीवर लागला. जागीच बेशुद्ध पडलेला अझीजचा रुग्णालयात जात असतानाच मृत्यू

Related posts

कलम ३७० रद्द करण्याविरोधी याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Gauri Tilekar

ICICI च्या चंदा कोचर आणि व्हिडिओकॉनचे वेणुगोपाल धूत गोत्यात

News Desk

‘फनी’ चक्रीवादळ ओडिसा किनारपट्टीवर धडकले, वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात

News Desk