HW News Marathi
देश / विदेश

मैत्रिणीवर बलात्कार करून व्हिडीओ टाकला पॉर्न साइटवर

बंगळुरू(वृत्तसंस्था) कंपनी काम करणा-या एका मैत्रिणीवर बलात्कार करून त्याचा व्हिडीओ पॉर्न साइटवर टाकल्याचा प्रकार बंगळुरू येथे घडला. या प्रकरणी एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक करण्यात आली आहे. अरिंदम नाथ असे आरोपीचे नाव असून तो पश्चिम बंगाल राज्यातील आहे. २६ वर्षीय पीडित तरुणी बंगळुरुमधील एका खासगी कंपनीत एचआर एक्झिक्यूटिव्ह म्हणून काम करत आहे. आरोपी अरिंदम नाथने पीडित तरुणीला एजिपुरा येथील आपल्या फ्लॅटवर बोलावून तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार करतानाचे शुटींग काढले. याच आधारे तो तरुणीला ब्लॅकमेल करत होता. मी सांगेन तेव्हा फ्लॅटवर आली नाहीस तर हा व्हिडीओ पॉर्न वेबसाईटवर अपलोड करेन अशी धमकीच त्याने तरुणीला दिली होती. तरुणीने त्याची मागणी मान्य केली. यानंतर अनेकदा माझ्यावर बलात्कार झाला.अशी माहिती तरुणीने तक्रारीत दिली आहे. यानंतर त्याने पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली होती. त्याने 4 सप्टेंबर रोजी व्हिडीओ पॉर्न वेबसाईटवर अपलोड केल्यानंतर मी त्याच्या मागण्यांना उत्तर देणं बंद केलं, अशी माहिती तरुणीने दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जोधपूरमध्ये भारतीय वायुसेनेचे मिग-२७ लढाऊ विमान कोसळले

News Desk

काँग्रेसने महाराष्ट्र सरकारला दिलेला पाठिंबा काढून टाकावा, आठवलेंचा सल्ला

News Desk

छत्तीसगडमधील सुकमा येथे 14 नक्षलींचा खात्मा

News Desk