मुंबई | डिजीटल व्यवहारासाठी वापरले जाणारे पेटीएम अॅप गुगल प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आले आहे. यामुळे आता गुगल प्ले स्टोअरवरुन पेटीएम डाऊनलोड करता येणार नाही. यामुळे लाखो पेटीएम युजर्सना धक्का बसला आहे. पेटीएमने गुगलच्या मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन केल्याने हे अॅप्लिकेशन हटवण्यात आल्याचे सांगितलं जात आहे.
Paytm taken off Google Play Store, citing policy violations. More details awaited. pic.twitter.com/fa2se6YSTn
— ANI (@ANI) September 18, 2020
गुगलने दिलेल्या माहिती नुसार आम्ही ऑनलाइन कॅसिनो किंवा कोणत्याही नियमनाविरोधातील जुगार खेळांना समर्थन देत नाही. या ऍपच्या माध्यमातून बाहेरच्या वेबसाइटलाही पैशाच्या माध्यमातून जुगार खेळण्याची परवानगी देण्यात येत होती. तसेच जिंकणाऱ्याला पैसे/रोख बक्षिसे दिली जात असल्याचं गुगलनं आपल्या निवेदनात सांगितलं आहे. पेटीएम हे अॅप जरी हटविण्यात आले असले तरीही पेटीएम मॉल, पेटीएम फॉर बिजनेस, पेटीएम मनीॅ अप आताही प्ले स्टोअरवर आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.