HW News Marathi
देश / विदेश

‘इस्रो’चे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त गुगलचे खास डुडल

मुंबई | गुगल हे नेहमीच जगभरातील कर्तुत्वा व्यक्तींच्या योगदानाला डुडलच्या सहाय्याने सलाम करते. तर गुगल कधी कधी महत्त्वाच्या तारखा व त्या दिवसाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपल्या युजर्सला खास डुडल तयार करून माहिती देते असते. गुगलने आज (१२ ऑगस्ट) भारतीय अंतराळ संशोधन मोहिमेचे जनक आणि ‘इस्रो’चे संस्थापक शास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल तयार करून त्यांना आदरांजली दिली आहे.विक्रम साराभाई यांचा जन्म अहमदाबाद येथे १२ ऑगस्ट १९१९ रोजी झाला आहे. साराभाई यांच्या वडिलांचे नाव अंबालाल आणि आईचे नाव सरलाबेन आहे. विक्रम यांचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. आईने सुरू केलेल्या शाळेत ते शिकले.

साराबाई यांचे १२वीपर्यंतचे शिक्षण गुजरातमध्ये झाले असून उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले होते. यानंतर केंब्रिज विद्यापीठातील सेंट जोन्स कॉलेजातून ते १९३९ साली रसायन आणि भौतिक विषयातील परीक्षा उतीर्ण केली. जगभरात जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झाले होते. साराभाई भारतात परतले आणि त्यांनी बंगळुरू येथील ‘इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स’ मध्ये नोबेल पुरस्कार विजेते सर सी. वि. रमण यांच्या मार्गदर्शनाखाली कोस्मिक किरणांवर संशोधन सुरू केले.

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ऑपरेशन रिसर्च ग्रुप, विक्रम साराभाई स्पेस सेंटर अशा देशांतील वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्थांच्या उभारणीत विक्रम साराभाई यांचे महत्वाचे योगदान आहे. उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना १९६२ साली शांती स्वरूप भटनागर पदक प्रदान करण्यात आले. त्यांना भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह मानले जाते. डॉ. विक्रम साराभाई यांचे ३० डिसेंबर १९७१ रोजी तिरुअनंतपुरम येथे वयाच्या ५२ वर्षी त्यांचे निधन झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांपाठोपाठ रामदास आठवलेही मोदींना भेटणार 

News Desk

देशातील १४ राज्यात तबलिकी समाजामुळे ६४७ जणांना कोरोनाची बाधा

News Desk

माहीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी !

News Desk