HW News Marathi
देश / विदेश

कामगार दिनानिमित्त गुगलचे खास डुडल

मुंबई : आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त गुगल कडून खास डुडल बनविण्यात आले आहे. जगभरात १ मे हा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. कामगार दिनाचे औचित्य साधून गुगलने डुडल व्दारे कामगारांच्या त्याग व संघर्षाला डुडलच्या माध्यमातून अनोखी मानवंदना दिली आहे. या डूडलमध्ये स्टेथॅस्कोप, सुरक्षा हेल्मेट, नट-बोल्ट, पेंटींग रोल, बॅटरी, रबर ग्लोब, चष्मा, टॉर्च, बुट आणि इतर अनेक कामगारांचे साहित्य दाखविले आहे.

अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबर या संघटनेने कामगारांसाठी आठ तासांचा कामाचा दिवस लागू करण्यात यावा असा संकल्प १ मे १८६६ ला जाहीर केला. या मागणीच्या समर्थनार्थ ३ मे रोजी शिकागो शहरात भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत पाच लाख कामगारांनी भाग घेऊन शक्तिप्रदर्शन केले. त्याचवेळी हेमार्केटमध्ये बॉम्बस्फोट झाल्याने कामगारांमध्ये धावपळ उडाली. यावेळी चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलक कामगारांवर गोळ्या झाडल्यानंतर प्राण गमावलेल्या कामगारांच्या स्मरणार्थ १८८९ मध्ये १ मे हा दिवस कामगार दिन म्हणून घोषित करण्यात आला. तेव्हापासून १ मे हा कामगार दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

298 भारतीय झाले पाकिस्तानी!

News Desk

अनिल देशमुखांवर ED कारवाईची आम्हाला बिलकुल चिंता नाही, कारण… ! | शरद पवार

News Desk

आज पुन्हा पेट्रोल १५ तर डिझेल १६ पैशांनी स्वस्त

Gauri Tilekar