मुंबई | पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी बँक) खातेदारांना रिझर्व्ह बँकेकडून मोठा दिलासा मिळाल आहे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार पीएमसी बँकेच्या खातेदारांना सहा महिन्यात १० हजार रुपये काढता येणार असल्याची माहिती दिली आहे. रिझर्व्ह बँकेनेत खातेधारकांना केवळ १ हजार रुपये काढण्याची मुभा दिली होती. मात्र, आरबीयाच्या आदेशचा खातेधारकांनी तीव्र विरोध प्रदर्शन केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
Directions under Section 35A of the Banking Regulation Act, 1949 (AACS) – Punjab and Maharashtra Cooperative Bank Limited, Mumbai, Maharashtra – Relaxation in withdrawal limit of Deposit Accountshttps://t.co/oYdCAl1BVB
— ReserveBankOfIndia (@RBI) September 26, 2019
पीएमसी बँकेच्या सर्व शाखांमध्ये सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. तसेच बँकेचे ऑनलाइन व्यवहारही बंद आहेत. बँकेची सद्यस्थिती पाहता नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने बँकेवर हे निर्बंध आणल्याचे आरपीआयने म्हटले आहे. आरबीआयने सोमवार ( २३ सप्टेंबर) हे निर्बंध लादले आहेत. आरबीयाच्या बँकेच्या परवानगीशिवाय कोणतेही नवे कर्ज देऊ शकत नाही. आणि जुन्या कर्जांचे नूतनीकरण करू नये, बँकेने कोणतीही गुंतवणूक करू नये, तसेच नव्या ठेवी स्वीकारू नयेत, असे स्पष्ट संकेत आरबीआयेने दिले आहे.
रिझर्व बँकेने बँकिंग रेग्युलेशन अॅक्टमधील नियम ३५-अ अंतर्गत बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. मात्र, त्याची माहिती खातेदारांना मंगळवारी (२४ सप्टेंबर) समजली. त्यामुळे बँकेच्या सर्व शाखांपुढे प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिसांनाही पाचारण करावे लागले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.