नवी दिल्ली | देदेशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात सीडीएस बिपीन रावत यांचे भारतीय वायूदलाच्या M-17V5 हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात बचावलेल्या एकमेव अधिकारी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे आज (१५ डिसेंबर) निधन झाले आहे. यावेळी बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह ११ लष्करी अधिकारी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता.
या हेलिकॉप्टर अपघातात बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांच्यावर आठवड्याभरापासून बंगळुरुमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. सिंह यांची आज अखेर मृत्यूशी झुंज अपयशी झाली. तामिळनाडूमधील कन्नरमध्ये ८ डिसेंबरला हेलिकॉप्टरचा अपघात झाला. यात जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि 11 लष्करी अधिकाऱ्यांना प्राण गमवावे लागले होते.
वरुण सिंह यांच्या निधनाची बातमी झाल्याचे कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत दु:ख व्यक्त केली आहे. मोदींनी ट्वीटमध्ये म्हणाले, “ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांनी अभिमाना आणि शौर्या देशाची सेवा केली. त्यांच्या निधनाने मला अत्यंत दु:ख झाले आहे. त्यांनी केलेली देश सेवा कधीही कोणी विसरु शकत नाही. त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्यासहवेदना, ओम शांती.”
Group Captain Varun Singh served the nation with pride, valour and utmost professionalism. I am extremely anguished by his passing away. His rich service to the nation will never be forgotten. Condolences to his family and friends. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) December 15, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.