HW News Marathi
देश / विदेश

गोवा मच्छिमार खात्याकडून गुजरातीची सक्ती

पणजी । गोव्यात एखाद्या पदासाठी गुजराती भाषेचे ज्ञान असावे अशी सक्ती करण्याला कोणतेही कारण असू शकत नाही. परंतु गोवाच्या मच्छीमार खात्याकडून वाहन चालक पदाच्या भरतीसाठी अर्जदाराला गुजराती भाषेचे ज्ञान असावे अशी अट लागू करण्यात आली आहे. गोवा मच्छिमार खात्याच्या या अजब अटीमुळे सोशल मीडियावर जोरदार टीका सुरू झाली होती. अखेर याची गंभीर दखल घेत मच्छीमार खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी तात्काळ ही जाहिरात मागे घेण्याची सूचना संचालकांना केली आहे.

गोव्यात याआधी कधीही सरकारी व खासगी नोकर भरतीवेळी अशी अट लागू केली गेलेली नाही. मात्र मच्छीमार खात्यातील काही अधिकाऱ्यांना ही अजब कल्पना सुचली. एक वर्षासाठी कंत्राट पद्धतीवर मच्छीमार खात्यात वाहन चालकाची भरती करण्यासाठी मच्छीमार खात्याने प्रसार माध्यमांमध्ये ही जाहिरात दिली होती. उमेदवाराला कोंकणीचे ज्ञान असावे आणि मराठी किंवा गुजरातीचे ज्ञान असावे अशा प्रकारची जाहिरात गोवा मच्छिमार खात्याकडून केली गेली होती.

मी जाहिरात मागे घेण्यास सांगितले असून ज्यांच्याकडून ही चूक झालेली आहे त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई केली जाईल, असे मंत्री पालयेकर म्हणाले. सोशल मीडियावर जोरदार टीकेला सामोरे जावे लागल्यानंतर पालेयकर यांनी ही जाहिरात मागे घेण्यासाठी जलद हालचाली सुरू केल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये घट

Gauri Tilekar

अरुण जेटली कुणाला म्हणाले “विनोदी राजकुमार”?

News Desk

Delhi Assembly Elections 2019 : आज दिल्लीकरांचे भवितव्य होणार सीलबंद

News Desk