HW News Marathi
देश / विदेश

बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे आज या पक्षात करणार प्रवेश!

नवी दिल्ली | अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे राजकारणात पदार्पण करणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. पांडे हे बिहारमधील सत्ताधारी पक्षात जाणार असून, आज (२७ सप्टेंबर) अधिकृतरित्या पक्षप्रवेश करणार असल्याचं वृत्त एएनआयनं दिले आहे. सुशांत प्रकरणात मुंबई व महाराष्ट्र सरकारवर टीका केल्यापासून पांडे चर्चेत आले होते.

पांडे हे काल (२६ सप्टेंबर) बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूमध्ये (संयुक्त जनता दल) प्रवेश करणार असल्याचे म्हटले होते. आज एएनआयनं त्यांच्या जदयूतील पक्षप्रवेशाविषयीचं वृत्त दिलं आहे. गुप्तेश्वर पांडे आज संयुक्त जनता दलात प्रवेश करणार असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्तीसगडमधील सुकमा येथे 14 नक्षलींचा खात्मा

News Desk

विजय माल्याला द्यावी लागणार भारतीय बँकांना भरपाई | ब्रिटन कोर्ट

News Desk

संसदेत तिसऱ्यांदा तिहेरी तलाक सादर, विरोधकांचा गोंधळ

News Desk