नवी दिल्ली | गुरुग्राम येथील खेडकी दौला जमीन खरेदी प्रकरणात भूपेंद्र सिंह हुड्डा, रॉबर्ट वड्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ”निवडणुकांचा काळात, इंधन दरवाढीच्या समस्येवरुन जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी माझा जवळपास एक दशकापूर्वीचा मुद्दा उकरुन काढण्यात आला आहे. यामध्ये नवीन असे काय?”, असे काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांनी म्हटले आहे.
२००८ साली रॉबर्ट वड्रा यांच्या स्काय लाइट हॉस्पिटॅलिटी या कंपनीने ओमकारेश्वर प्रॉपर्टीजकडून खरेदी केलेल्या साडे तीन एकर जमिनीची किंमत साडेसात कोटी रुपये दाखवण्यात आली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. स्काय लाइट हॉस्पिटॅलिटीने गुडगावमधील शिकोहपूर, सिंकदरपूर, खेडकी दौला आणि सिहीमध्ये ७.५ कोटी रुपयांची जमिनी खरेदी व्यवहार केली आणि नंतर याच जमिनीची विक्री 55 कोटी रुपयांमध्ये करण्यात आली असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
Election season, increase in oil prices…so let’s divert real people’s issues with my decade old issue. What’s new?: Robert Vadra's statement on FIR against him (file pic) pic.twitter.com/Ev8ybmNwKR
— ANI (@ANI) September 1, 2018
” वड्रा, हुड्डा, स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी आणि डीएलएफ विरोधात गुरुग्रामच्या खेडकी दौला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरिंदर शर्माने दाखल केलेल्या या तक्रारीत जमिनीच्या खरेदी करारामध्ये अनियमितता असल्याचा आरोप करण्यात आला आहे,” मानेसरचे पोलीस उपायुक्त राजेश कुमार यांनी अशी माहिती दिली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.