मुंबई | हार्दिक पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हार्दिक पटेल यांनी आज (२ जून) १५ हजार कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हार्दिक पटेलने १८ मे रोजी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याची माहिती त्यांच्या ट्वीट करत दिली होती. तेव्हापासून हार्दिक पटेल भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. हार्दिक पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश करत सर्व चर्चा खऱ्या असल्याचे सिद्ध झाले आहे. यंदा गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून गेल्या २० वर्षापासून भाजपची गुजरातमध्ये सत्ता आहे. या पार्श्वभूमीवर हार्दिक पटेल यांनी गुजरातमध्ये प्रवेश केला आहे.
Hardik Patel who recently quit Congress joins BJP in Gandhinagar, Gujarat pic.twitter.com/JT6UtIPPJg
— ANI (@ANI) June 2, 2022
“राष्ट्रहित, राज्यहित, जनहित आणि सामाजिक हित या भावनेतून मी आजपासून एक नवा अध्याय सुरू करणार आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशसेवेच्या उदात्त कार्यात मी एक लहान सैनिक म्हणून काम करेन,” असे ट्वीट हार्दिक पटेल यांनी भाजपमध्ये सामील केले होते.२०१५ मध्ये गुजरातमध्ये सरकारी नोकरी आणि शिक्षणात पाटीदार समाजाला आरक्षणासाठी हार्दिक पटेलने मोठे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनामुळे हार्दिक पटेलला चांगली प्रसिद्ध मिळाली होती. यावेळी हार्दिक पटेल हे २८ वर्षीय होते. तेव्हा पादीदार समाजाचे नेतृत्व करत होते. त्यावेळी पाटीदार आंदोलनादरम्यान हिंसाचारा झाला आणि यात एका पोलिसांसह १० जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर हार्दिक पटेलविरोधात गुन्हा दाखल झाला होता.
राष्ट्रहित, प्रदेशहित, जनहित एवं समाज हित की भावनाओं के साथ आज से नए अध्याय का प्रारंभ करने जा रहा हूँ। भारत के यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेन्द्र भाई मोदी जी के नेतृत्व में चल रहे राष्ट्र सेवा के भगीरथ कार्य में छोटा सा सिपाही बनकर काम करूँगा।
— Hardik Patel (@HardikPatel_) June 2, 2022
दरम्यान हार्दिक पटेल यांनी ९ सप्टेंबर २०१५ मध्ये पटेल नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली होती. २०१५ मध्ये हार्दिक पटेल यांच्यावर राष्ट्रध्वाजाचा अपमान करण्याचा आरोप लावण्यात आला होता. हार्दिक पटेल यांनी मार्च २०१९ मध्ये अहमदाबाद येथे काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत तत्कालीन पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसने हार्दिक पटेल यांना काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी २०२० मध्ये काँग्रेस गुजरातचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.