HW Marathi
देश / विदेश

चांद्रयान-२ : इतिहास रचण्यासाठी सज्ज

भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम असलेल्या चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. उद्या १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून GSLV मार्क-३च्या मदतीने चांद्रयान-२चंद्राकडे झेपवणार आहे. लॉन्चिंग नंतर ५२ दिवसाने चांद्रयान-२ चंद्रावर पोहोचेल. इस्रोच्या या महत्त्वकांशी मोहीमेकडे केवळ भारताचेच नव्हे तर जगाचेही लक्ष लागले आहे.

आज सकाळी 6.51 वाजता 20 तासांसाठी चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. भारतीय अंतराळ संघटनेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. शिवन यांनी सांगितले की, आतापर्यंत सर्वकाही व्यवस्थित सुरु आहे. चांद्रयान-2 ला इस्त्रोचे सर्वात शक्तिशाली रॉकेट जीएसएलव्ही -MK-3 अंतराळात घेऊन झेपावणार आहे.

चांद्रयान-२च्या माध्यमातून इस्रो चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणार आहे. या ध्रुवावर आजवर जगातील कोणत्याच देशाचे यान पोहोचलेले नाही.  चांद्रयान ६ किंवा ७ सप्टेंबर रोजी दक्षिण ध्रुवाजवळ उतरेल. यानंतर भारत चंद्राच्या जमिनीवर उतरणारा चौथा देश बनेल.चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आजवर कोणताही देश पोहोचू शकलेला नाही. मात्र, भारत आता या ठिकाणी आपले यान उतरवून इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुर्याची किरणं सरळ नाही तर तिरकी पडतात. त्यामुळे येथील तापमान खूपच कमी असते.चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील बहुतांश भागावर कायम अंधार असतो. त्याशिवाय या ठिकाणी मोठ-मोठे खड्डेही आहेत. या खड्ड्यांचे तापमान -२५० डिग्री सेल्सिअसच्या जवळपास पोहोचते. इतक्या कडाक्याच्या थंडीत लँडर आणि रोवरला चालवणे मोठे आव्हानात्मक आहे.

ही मोहीम यशस्वी झाल्यास या प्रकारची शक्ती असलेला अमेरिका, रशिया आणि चीननंतर चौथा देश भारत ठरणार आहे. चंद्रावर पाण्याचे अस्तित्व तसेच तेथील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करणे हा असला तरी या मोहिमेतून भारताच्या येणाऱ्या अवकाश मोहिमांसाठी हा अनुभव मैलाचा दगड ठरणार आहे.

 

Related posts

भारतातील सत्ताधारी पक्ष मुस्लिम समाजासह पाकिस्तानविरोधी !

News Desk

अदनानचा अपमान, भारतीय कुत्रे’ म्हणून हिणवले

News Desk

तब्बल १४ दिवसांनंतर जम्मू-काश्मीरमधील शाळा सुरू

News Desk