HW News Marathi
Covid-19

देशात गेल्या २४ तासात ६७६७ रुग्णांच्या संख्येत सर्वाधिक वाढ, तर १४७ जणांचा मृत्यू

मुंबई | देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे तब्बल ६ हजार ७६७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. देशात एका दिवसात झालेली ही सर्वाधिक रुग्ण संख्या वाढ आहे. तर गेल्या २४ तासात कोरोनामुळे १४७ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ३१ हजार ८६८ एवढी झाली आहे. देशात सध्या ७३ हजार ५६० अॅक्टिव्ह केसेस आहेत. बरे झालेल्या ५४ हजार ४४० लोकांना घरी सोडण्यात आले आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे ३ हजार ८६७ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान, देशात महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार १९० वर पोहोचली आहे. काल (२३ मे) २६०८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात काल ८२१ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १३ हजार ४०४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३२ हजार २०१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोफत लसीकरणाच्या राज्याच्या निर्णयाचे स्वागत, मोहिम सुरुळीत पार पडावी !

News Desk

पुणे विभागातील 5 लाख 84 हजार 922 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी 

News Desk

दबावाखाली न येता वाधवान कुटुंबियांना पत्र दिल्याची अमिताभ गुप्ता यांची कबुली

News Desk