HW Marathi
देश / विदेश

हा हल्ला करण्यासाठी हिज्बुलच्या अतिरेक्याने मला ५० हजार रुपये दिले !

नवी दिल्ली | “आपल्याला हा हल्ला करण्यासाठी हिज्बुल मुजाहिदीनच्या एका अतिरेक्याकडून ५० हजार रुपये मिळाले”, अशी कबुली जम्मूतील बॉम्ब हल्ल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या हल्लेखोराने दिली आहे. जम्मू बस स्थानक बॉम्ब हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला हा मुलगा अल्पवयीन असल्याची देखील माहिती मिळत आहे.

जम्मूतील बसस्थानकावर हातबॉम्ब फेकून पळून जात असताना या अल्पवयीन हल्लेखोराला पकडण्यात आले होते. आधार कार्डसह अन्य ओळ्खपत्रांनुसार त्याची जन्मतारीख १२ मार्च २००३ असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु, तरीही कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी त्याच्या वायबाबतची खात्री करून घेण्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी दहशतवादी संघटनांनी लहान मुलांचा वापर करण्यास सुरुवात केल्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

Related posts

नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा

Ramdas Pandewad

मोदी सरकारची आज कसोटी, टीडीपी, कॉँग्रेसचा अविश्वास प्रस्ताव

News Desk

त्रालमध्ये चकमक, सुरक्षा दलाच्या जवानांनी २-३ दहशतवाद्यांना घेरले

News Desk