नीरव मोदीने पीएनबी बँकेला लेटर ऑफ अंडरटेकिंग घोटाळ्यात तब्बल ११,५०० कोटीचा चुना लावल्याने ईडीने मोदींच्या मालमत्तेवर छापे टाकण्यात आली आहे. या छप्यात मोदींच्या गितांजली जेम्स या शोरूममधून ५१०० कोटी रुपयांचे हिरे आणि दागिने हस्तगत केले. त्याचबरोबर त्यांच्या बँक खात्यातील ३.९ कोटींच्या ठेवी आणि मुदत ठेवी देखील जप्त केल्या आहेत.
मोदींच्या मुंबई, सुरत आणि नवी दिल्ली या ठिकाणांच्या कार्यालये, शोरुम्स आणि वॉर्कशॉप्सवर ईडीने छापे मारले आहे. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील भारत डायमंड बॉर्समधील फायरस्टार डायमंड प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्यालय, कुर्ला पश्चिममधील कोहिनूर सीटीमधील मोदीचे खासगी कार्यालय, शारुम्स तसेच दक्षिण मुंबईतील फोर्ट येथील इट्स हाऊस येथील बुटीक आणि लोअर परळ येथील पेनिंसुला बिझनेस पार्कमधील वर्कशॉपवरही ईडीने छापे मारून तेथील मालमत्ता जप्त केली आहे.
रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाने Indian’s bad loans असे नाव देऊन या १२ कंपनीच्या यादी जाहीर केली होती. बँकेकडून कर्ज घेऊन अजूनपर्यंत कर्ज परत न केलेल्या कंपन्यांची यादी जाहीर केली होती. यात Lanco Infratech first, bhushan steel, S. R. steels pvt ltd, alok textiles industries ltd, amtek auto ltd, electrosteel steels ltd, abg shipyard ltd, jp infrastructure ltd अशी १२ कंपनीच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली होती. यावर मोदी सरकारने कोणत्याही प्रकारची कारवाई तर सोडाच पण, साधी चौकशी देखील केली नाही.
नीरव मोदीला दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये मोदी सरकार घेऊन गेले होते. यावरुन सरकारवर सर्व बाजूने टीका होत आहे. मोदीसोबत एकत्र दिसून नीरव मोदींना खूप फायदे घेतले. या सर्व प्रकरणावर देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्टीकरण देण्याऐवजी रक्षा मंत्री सतारामण यांनी पत्रकार परिषद घेतली होती. “पीएनबी घोटाळा काँग्रेस सरकारच्या काळात झाला आहे. आमच्या सरकारने फक्त हा घोटाळा उघडकीस आणला असल्याचा दावा” रक्षा मंत्री सतारामण यांनी पत्रकार परिषदेत केला. देशात करोडोचा चुना लावणाऱ्यांच्या यादी नीरव मोदी हे काही पहिले व्यक्ती नाही. याआधी, ललित मोदी आणि विजय माल्या या दोघांनी ही देशाला चूना लावून परदेशात पळून गेले आहे. या सर्वांना मोदी सरकार कधी परत घेऊन येणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.