HW News Marathi
देश / विदेश

कमल हासन यांना गांधींकडे पोहचविण्याची तयारी केली जाईल | हिंदू महासभा

मेरठ | नथुराम गोडसे हा देशातील पहिला दहशतवादी होता, वादग्रस्त वक्तव्य दाक्षिणात्य सुपरस्टार आणि मक्कल निधी मियाम या पक्षाचे प्रमुख कमल हासन यांनी केले होते. या विधानानंतर देशातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. सर्व स्तरातून कमल हासन यांच्यावर तीव्र शब्दात नाराज व्यक्त केली जात असताना. मात्र दुसरीकडे हिंदुत्ववादी संघटनांनी या विधनावर आक्रमक पवित्रा घेतला म्हणाले की, कमल हासन यांना गांधींकडे पोहचविण्याची तयारी केली जाईल, असा धमकी वजा इशारा कमल हासन यांना अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रवक्ते अभिषेक अग्रवाल यांनी दिला आहे.

नथुराम गोडसे यांना दहशतवादी बोलणारे मुर्ख आणि हिंदुच्या नावावर कलंक, अशा शब्दात हिंदू महासभेचे प्रवक्ते अभिषेक अग्रवाल यांनी काल (१३ मे) मेरठमध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. पुढे अभिषेक अग्रवाल म्हणाले की, नथुराम गोडसेंच्या नावावर कमल हसन यांच्याकडून घाणेरडे राजकारण केले जात आहे. दहशतवादी कृत्यांना समर्थन देणारे कमल हसन, फारुख अब्दुला, नवज्योत सिंग सिद्धू आणि मेहबुबा मुफ्तीसारखे लोक आहे. जे दहशतवाद्यांचे रक्षण करतात असे त्यांनी सांगितले.

तसेच नथुराम गोडसे यांचे नाव दहशतवादासोबत जोडण्याचे काम केले त्यामुळे हासन यांच्या हत्येसाठी ते स्वत:च जबाबदार असतील. नथुराम गोडसे हे हिंदूचे आदर्श होते आणि कायम राहणार आहेत. कमल हासन यांनी गांधींकडे पोहचविण्याची तयारी केली जाईल असा इशारा हिंदू महासभेचे अभिषेक अग्रवाल यांनी कमल हसनला दिला आहे. त्याचसोबत एआयडीएमकेकडून कमल हासन यांच्या विधानाचा निषेध करत त्यांची यांची जीभ छाटली पाहिजे असे विधान तामिळनाडुतील मंत्री टी. राजेंद्र यांनी सोमवारी केले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात पहिल्यांदाच महिला गुन्हेगाराला फाशी होणार!

News Desk

आम्ही भारतात घुसलो तर खळबळ माजेल

News Desk

हाशिमपुरा नरसंहार प्रकरण | १६ पीएसी जवानांना आजन्म कारावास

Gauri Tilekar