HW News Marathi
देश / विदेश

मुलींच्या होस्टेलमध्ये सापडले कोट्यवधींचे हिरे

चेन्नई: तामिळनाडूतील तिरूवरूर जिल्’ातील एका महिला कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये तपास करत असताना आयकर विभागाला घबाड सापडले आहे. या हॉस्टेलमधील एका बंद खोलीत आयकर विभागाला लाखो रूपयांचे दागिने व घड्याळं सापडली. एआयएडीएमकेच्या सदस्य शशिकला आणि त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित संपत्तीची माहिती जमा करत असताना आयकर विभागाने या हॉस्टेलवर धाड मारली. आयकर विभागाने आत्तापर्यंत सहा कोटींची रोकड, दोन कोटी चार लाख रुपये किंमतीच साडेआड किलो सोनं आणि बाराशे करोड रूपयांच्या गुंतवणुकीची कागदपत्र जप्त केली आहेत. या सगळ्या वस्तूंच्या उत्पन्नाचा कुठलाही मार्ग मालकांनी सांगितला नाही.

आयकर विभागाने शशिकला यांचा भाऊ व्ही धीवाहरन यांच्या मालकीच्या असलेल्या सेंगमाल थय्यर एज्युकेशनल ट्रस्ट वुमन्स कॉलेजवर धाड टाकली. हॉस्टेलमध्ये असेलल्या एका बंद खोलीत आयकर विभागाला हिºयांचे दागिने आणि रोलेक्सची घड्याळे सापडली आहेत. या दागिने व घड्याळ्यांची एकूण किंमत आयकर विभागाकडून तपासली जाते आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू-काश्मीरमधील धरण परिसरात लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं!

News Desk

४५३ कोटी जमा करा, अन्यथा ३ महिने शिक्षा भोगा | सर्वोच्च न्यायालय

News Desk

वादग्रस्त कृषी कायद्यांना तूर्तास स्थगिती देण्याबद्दल सरकारने विचार करावा, सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला

News Desk