HW News Marathi
देश / विदेश

HW Exclusive :… म्हणून चीन भारतासोबत युद्धाचे धाडस करणार नाही !

मुंबई | गलवान खोऱ्यात भारत-चीन सीमेवर दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, १५ जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात ही हिंसक झडप झाली होती. सुरुवातीला तीन जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली होती. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार चीनचेही ४३ जवान मारले गेलेत किंवा जखमी झाले आहेत. या संदर्भात एच. डब्ल्यू. मराठीने आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर यांच्याशी खास बातचीत केली आहे. यात चीन गलवान खोऱ्यात आता इतका आक्रमक का झाला, भारत-चीन युद्ध होणार का?, भारत-चीन संघर्षामध्ये भारतापुढे कोणते पर्याय आहेत ? या विषयांवर सखोल चर्चा केली आहे.

शैलेंद्र देवळाणकर म्हणतात की , भारत आणि चीन या दोन्ही देशात असे अनेक क्षेत्रात वाद आहेत. परंतु गलवान खोऱ्यात याआधी अशा प्रकारचा संघर्ष उफाळून आला नव्हता. मात्र, पहिल्यांदा चीनने गलवान खोऱ्यात सैन्यांची जमवा-जमव केली. चीनने गलवान खोऱ्यासंदर्भात आक्रमक पवित्रा घेतला आहे. या घटनेनंतर खोऱ्यावर चीनने आपला अधिकार सांगितला आहे. चीनने भारतावर अशा वेळी हल्ला केला, जेव्हा दोन्ही देश वाद निवळ्यासाठी चर्चा करत आहेत. या चर्चेची पहिली फेरी ६ जून रोजी पार पडली आहे. ही चर्चा सैन्यातील अधिकारी आणि दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्र्यालयाचे सचिव यांच्यामध्ये झाली होती. यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून वृत्त आले होते की, आम्ही हा सीमा वाद शांतता आणि चर्चेच्या माध्यमातून सोडवू आणि चर्चेच्या अजून काही फेऱ्या होणार होत्या. जेव्हा गलवान खोऱ्यातील तणाव निवळण्याचे प्रयत्न सुरू होते तेव्हा चीनकडून गलवान खोऱ्यात सैन्यावर हल्ला झाला. भारतीय सैन्यावर झालेला हल्ला हा विश्वासघातच नाही तर हा हल्ला युद्ध गुन्हा आहे. या युद्ध गुन्हानुसार, जेव्हा दोन्ही देशात वाटघाटी किंवा तह होत असतो तेव्हा कोणताही हल्ला करायचा नसतो.

चीनने भारतावर केलेला हल्ला पूर्वनियोजित

गलवान हा डोंगळा भाग असून हे जगातील सर्वात अवघड असे ठिकाण आहे. याठिकाणी युद्ध करणे अत्यंत अवघड आहे. मात्र, हा संपूर्ण प्रदेश आपल्यासाठी सामाजिक दृष्ट्या फार महत्वाचा आहे. कारण गलवान खोऱ्यातून आपण तीबेटच्या ज्या हालचाली आहे, विशेष करून ज्या लष्करी हालचाली आहेत त्यावर भारत लक्ष ठेवू शकतो. या भागात चीनने आतापर्यंत कधीही अधिकार गाजवला नव्हता आणि अचानक चीनने गलवान या भागात आपला अधिकार सांगितला. चीनने भारतीय सैन्यावर केलेला हल्ला पूर्वनियोजीतहोता, असे आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी दिलेल्या मुलाखतीत सांगितले. या हल्लात भारताचे २० जवान शहीद झाले आहे. तर भारतीय सैन्यानेही हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर देत चीनचे ४३ सैन्य ठार केले आहे. मात्र, या घटनेनंतर भारत व चिनमधील संघर्ष येत्या काळात चिघळण्याची शक्यता आहे, असेही मत अभ्यासक शैलेंद्र देवळणकर यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले.

कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय समुदाय चीनच्याविरोधात

या घटनेनंतर भारत आणि चीनमध्ये युद्ध होणार का?, या प्रश्नावर उत्तर देताना आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर म्हणाले, या संघर्षाचे रुपांतर युद्धात होणार नाही. कारण चीन आणि भारतालाही युद्ध नको आहे. या संघर्षाचे रुपांतर झाले तर भारताला फक्त चीनबरोबर नाही तर पाकिस्तानसोबत देखील युद्ध करावे लागेल. कारण लडाखमध्ये पाकिस्तान आणि चीन दोन्ही देशांचा समावेश आहे. भारत या युद्धासाठी सक्षम असेल तरी हे युद्ध सध्याच्या परिस्थितीला परवडणारे नाही. कारण देशात सध्या कोरोनाच्या परिस्थितीचा सामना करण्यामध्ये भारत व्यस्त आहे. कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. आणि चिनलाही युद्ध नको आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर चीन सध्या एकटा पडला आहे. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, युके आणि जर्मनी यांनी चीनला कोरोनामुळे झालेल्या नुकसान भरपाईचे बिल पाठवले आहे. तर ऑस्ट्रेलिया ही चीनवर आता उघडपणे टीका करत आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय हा चीनच्या विरोधात असल्यामुळे चीन युद्धाचे धाडस करणार नाही.

संपूर्ण मुलाखत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लिव्ह-इन रिलेशनशिपमधील महिलेला मिळणार पोटगी

News Desk

भारतीय लष्कराकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk